Maharashtra Election 2019 ; निवडणूक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण व बहुपर्यायी चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 06:00 AM2019-10-13T06:00:00+5:302019-10-13T06:00:52+5:30

निवडणूक कामासाठी राखीवसह ४३ क्षेत्रीय अधिकारी, ४०४ केंद्राध्यक्ष व १ हजार २५३ मतदान अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून प्रशासकीय यंत्रणा निवडणूक कामासाठी सज्ज झाली आहे. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ.इंदुराणी जाखड उपस्थित होत्या. त्यांनीही मतदान प्रक्रियेत नेमणूक झालेल्या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.

Maharashtra Election 2019 ; Training and multi-faceted testing of election staff | Maharashtra Election 2019 ; निवडणूक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण व बहुपर्यायी चाचणी

Maharashtra Election 2019 ; निवडणूक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण व बहुपर्यायी चाचणी

Next
ठळक मुद्देप्रात्यक्षिकही दाखविले । निवडणूक निरीक्षकांनी केले मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली विधानसभा मतदार संघासाठी नेमणूक केलेल्या कर्मचाऱ्यांची दुसरे प्रशिक्षण येथील आयटीआयच्या इमारतीत पार पडले. गुरूवार ते शनिवार असे तीन दिवस हे प्रशिक्षण घेण्यात आले. निवडणूक निरीक्षक प्रवीण गुप्ता यांनी प्रशिक्षणाला भेट देऊन कर्मचाऱ्यांना निवडणूक कामाविषयी मार्गदर्शन केले.
निवडणूक कामासाठी राखीवसह ४३ क्षेत्रीय अधिकारी, ४०४ केंद्राध्यक्ष व १ हजार २५३ मतदान अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून प्रशासकीय यंत्रणा निवडणूक कामासाठी सज्ज झाली आहे. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ.इंदुराणी जाखड उपस्थित होत्या. त्यांनीही मतदान प्रक्रियेत नेमणूक झालेल्या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. पहिल्यांदाच प्रशिक्षणात निवडणूक कामकाजासंबंधी २१ प्रश्नांची बहुपर्यायी चाचणी घेण्यात आली. चाचणीनंतर सर्व प्रश्नांवर चर्चा घडवून आणण्यात आली तसेच विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांचे व शंकांचे समाधान करण्यात आले.
कर्मचाऱ्यांना थेअरी तसेच ईव्हीएमच्या प्रात्यक्षिकाचे धडे देण्यात आले. कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट, व्हीव्हीपॅट, ईव्हीएमची जोडणी, सी.आर.सी. अभिरूप मतदान, प्रत्यक्ष मतदान, यंत्रात बिघाड झाल्यास व आपत्कालीन उपाययोजना, मतदान प्रक्रिया, सील व मोहोर लावणे, निवडणूकविषयक कागदपत्रे, क्षेत्रीय अधिकारी, केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे कर्तव्य व जबाबदाऱ्या आदींबाबत माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी निवडणूक कर्मचाऱ्यांना ओळखपत्र तसेच संबंधित कर्मचाऱ्यांना ज्या मतदान केंद्रावर काम करीत असतील त्या मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी निवडणूक कार्य प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. प्रशिक्षणार्थ्यांना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे देखील मार्गदर्शन लाभत आहे.
यावेळी तहसीलदार महेंद्र गणवीर, नायब तहसीलदार देवेंद्र दहिकर, अविनाश पिसाळ, हेमंत मोहरे उपस्थित होते.

१,३२० कर्मचाऱ्यांनी घेतले प्रशिक्षण
शंकांचे निरसन । देसाईगंजात तीन दिवसीय अंतिम प्रशिक्षण
देसाईगंज : आरमोरी विधानसभा मतदार संघाअंतर्गत निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाºयांचे १० ते १२ आॅक्टोबर दरम्यान देसाईगंज येथील सांस्कृतिक भवनात अंतिम प्रशिक्षण पार पडले. या प्रशिक्षणादरम्यान एकूण १ हजार ३२० कर्मचाºयांनी निवडणुकीबाबत विविध प्रकारची माहिती जाणून घेतली. व्हीव्हीपॅट व ईव्हीएम मशीनची हाताळणी, कंट्रोल युनिट, बॅलेज युनिट आदीबाबतची माहिती दिली. सदर प्रशिक्षणात निवडणूक निरीक्षक आर.एस.धिल्लन, निवडणूक निर्णय अधिकारी विशालकुमार मेश्राम, सहायक निवडणूक अधिकारी कल्याणकुमार डहाट यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. एका मतदन केंद्रावर एक केंद्राध्यक्ष व तीन कर्मचारी असे एकूण चार जण कार्यरत राहणार आहेत. अतिसंवेदनशील भागातील एका बुथवर पाच कर्मचारी राहणार आहेत. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया कशी पार पाडायची, याबाबतची संपूर्ण माहिती या अंतिम प्रशिक्षणात देण्यात आली. सोबतच पोलीस विभागामार्फत पुरविण्यात येणाºया सुरक्षा व्यवस्थेबाबतची माहिती देण्यात आली. याप्रसंगी निवडणूक अधिकाऱ्यांकडून चाचणी घेण्यात आली.

Web Title: Maharashtra Election 2019 ; Training and multi-faceted testing of election staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.