लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली विधानसभा क्षेत्रात उभ्या असलेल्या १६ उमेदवारांच्या नावांसह नोटाच्या पर्यायासाठी एका बॅलेट युनिटवर जागाच उपलब्ध होणार नाही. त्यामुळे या मतदार संघातील प्रत्येक बुथवर दोन बॅलेट युनिट राहतील अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.इंदूराणी जाखड यांनी पत्रकार परिषदेत दिली.मतदान यंत्रावर (बॅलेट युनिट) केवळ १६ बटन असतात. गडचिरोलीत उमेदवार १६ आहेत. पण नोटाच्या पर्याय बॅलेट युनिटवर आवश्यक असल्यामुळे त्याच्यासाठी पहिल्या बॅलेट युनिटवर जागाच नाही. एक बटन कमी पडत असल्याने दोन मतदान यंत्रांचा प्रत्येक बुथावर वापर केला जाणार असून ‘नोटा’चा पर्याय दुसऱ्या बॅलेट युनिटवर राहील, अशी माहिती डॉ.जाखड यांनी दिली.डॉ.जाखड यांनी सांगितले की, दोन मतदान यंत्रांपैकी पहिल्या यंत्रावर सोळाही उमेदवारांची नावे व चिन्ह राहणार आहेत, तर दुसऱ्यामतदान यंत्रावर नोटाचे बटन राहणार आहे. दोन्ही मतदान यंत्रे कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅटशी जोडले राहतील. त्यामुळे मतदान करताना कोणतीही अडचण जाणार नाही. उमेदवारांचे नाव, चिन्ह यासाठी गुलाबी रंगाचा कागद वापरला जाणार आहे. गडचिरोली विधानसभा क्षेत्रात एकूण ३४६ मतदान केंद्रे आहेत. निवडणूक विभागाकडे ४६४ कंट्रोल युनिट, ८९९ बॅलट युनिट, ४८८ व्हीव्हीपॅट मशीन उपलब्ध आहेत. वेळेवर मतदान केंद्र बंद पडल्यास धांदला होऊ नये यासाठी अधिकच्या मशीन ठेवण्यात आल्या आहेत. वेळेवर मशीन उपलब्ध व्हावी यासाठी या मशीन क्षेत्रीय अधिकारी, तहसील व उपविभागीय कार्यालयात ठेवल्या जातील. मागणी होताच मशीन उपलब्ध करून दिली जाणार आहे, अशी माहिती जाखड यांनी दिली. यावेळी तहसीलदार महेंद्र गणवीर हजर होते.दीड तासापूर्वीच मॉकपोलसकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरूवात होणार आहे. मतदानाच्या दीड तासापूर्वी मॉकपोल घ्यावा असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यामुळे मॉक पोलला सकाळी ५.३० वाजता सुरूवात केली जाणार आहे. मतदान यंत्राची पारदर्शकता तपासण्यासाठी उमेदवारांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहणे अपेक्षित आहे. मात्र उमेदवारांचे प्रतिनिधी वेळेवर उपस्थित न झाल्यास मतदान केंद्राध्यक्ष मॉक पोलला सुरूवात करतील. मॉकपोलमध्ये किमान ५० मते वेगवेगळ्या उमेदवारांना टाकली जातील. मशीनमध्ये दाखवित असलेली मते व व्हीव्हीपॅटमधील चिट्या मोजल्या जातात. यावरून मशीनची पारदर्शकता दिसून येते.‘नोटा’ऐवजी आता ‘वरीलपैकी कुणीही नाही’विधानसभा क्षेत्रात उभ्या असलेल्या एकाही उमेदवाराला मत द्यायचे नाही. मात्र मतदान करायचे असेल तर संबंधित मतदाराला नोटावर (नन ऑफ द अबो) मतदान करण्याचा अधिकार देण्यात आला होता. यापूर्वी इंग्रजीमध्ये ठडळअ असे लिहिले राहत होते. उमेदवारांची नावे मराठीत, मात्र ही एकच बटन इंग्रजीमध्ये राहत होती. काही जणांना नोटाचा अर्थही कळत नव्हता. त्यामुळे निवडणूक आयोगाने स्थानिक भाषेचा वापर करून तसा अर्थबोध होईल, असा शब्द लिहावा, असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत ‘नोटा’ ऐवजी ‘वरील पैकी कुणीही नाही’, असे लिहिले राहणार आहे. मराठीत असल्याने मतदारांना समजण्यास सोपे जाणार आहे.
Maharashtra Election 2019 ; गडचिरोली विधानसभेत राहणार दोन बॅलेट युनिट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 6:00 AM
डॉ.जाखड यांनी सांगितले की, दोन मतदान यंत्रांपैकी पहिल्या यंत्रावर सोळाही उमेदवारांची नावे व चिन्ह राहणार आहेत, तर दुसऱ्यामतदान यंत्रावर नोटाचे बटन राहणार आहे. दोन्ही मतदान यंत्रे कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅटशी जोडले राहतील. त्यामुळे मतदान करताना कोणतीही अडचण जाणार नाही. उमेदवारांचे नाव, चिन्ह यासाठी गुलाबी रंगाचा कागद वापरला जाणार आहे.
ठळक मुद्देउमेदवार जास्त असल्याने अडचण : निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची माहिती