Maharashtra Election 2019 ; कोणते डॉक्टर पकडणार मतदारांची नाडी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 06:00 AM2019-10-18T06:00:00+5:302019-10-18T06:00:32+5:30

परिस्थिती फारशी अनुकूल नसताना विद्यमान आमदार डॉ.होळी यांनी वरिष्ठांची मर्जी संपादन करत पुन्हा भाजपचे तिकीट पटकावण्यात यश मिळवले. पण तत्पूर्वीच त्यांनी जनसंपर्क आणि गावागावात छोट्यामोठ्या कार्यक्रमांचा धडाका लावून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची पार्श्वभूमी तयार केली होती. भाजपची बुथनिहाय कार्यकर्त्यांची रचना, जातीच्या उमेदवाराला मतदान करण्याची मतदारांची मानसिकता, चामोर्शी तालुक्यातील बंगाली व्होटबँक या जमेच्या बाजुमुळे ते भक्कम स्थितीत आले आहे.

Maharashtra Election 2019 ; Which doctor will catch the pulse of voters? | Maharashtra Election 2019 ; कोणते डॉक्टर पकडणार मतदारांची नाडी?

Maharashtra Election 2019 ; कोणते डॉक्टर पकडणार मतदारांची नाडी?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली विधानसभा निवडणुकीत दोन डॉक्टरांमधील लढत आता निर्णायक टप्प्यात आली आहे. भाजपचे विद्यमान आमदार डॉ.देवराव होळी आणि काँग्रेसच्या डॉ.चंदा कोडवते यांच्यात थेट लढत असली तरी महाआघाडीतील शेतकरी कामगार पक्षाने या मतदार संघात उमेदवारी कायम ठेवून उमेदवारांच्या अडचणीत वाढ केली आहे. अशा स्थितीत मुख्य लढतीमधील दोन्ही डॉक्टरांपैकी कोण मतदारांची ‘नाडी’ पकडण्यात यशस्वी होतो, यावरच विजयाचे गणित ठरणार आहे.
परिस्थिती फारशी अनुकूल नसताना विद्यमान आमदार डॉ.होळी यांनी वरिष्ठांची मर्जी संपादन करत पुन्हा भाजपचे तिकीट पटकावण्यात यश मिळवले. पण तत्पूर्वीच त्यांनी जनसंपर्क आणि गावागावात छोट्यामोठ्या कार्यक्रमांचा धडाका लावून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची पार्श्वभूमी तयार केली होती. भाजपची बुथनिहाय कार्यकर्त्यांची रचना, जातीच्या उमेदवाराला मतदान करण्याची मतदारांची मानसिकता, चामोर्शी तालुक्यातील बंगाली व्होटबँक या जमेच्या बाजुमुळे ते भक्कम स्थितीत आले आहे. सोबतच शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अरविंद कात्रटदार आणि त्यांची फळी रात्री उशिरापर्यंत मतदारसंघात जनसंपर्क ठेवून युतीधर्म निभावताना दिसत आहे. खासदार नेते यांनीही प्रचाराला लागून आपले मतभेद असले तरी मनभेद नसल्याचे दाखविले.
दुसरीकडे काँग्रेसने मोठ्या अपेक्षेने डॉ.चंदा कोडवते या फ्रेश महिला उमेदवाराला निवडणुकीत उतरवले. गेल्या लोकसभा निवडणुकीपासूनच कोडवते दाम्पत्याची निवडणूक लढण्याची तयारी पाहता त्यांची राजकारणातील एन्ट्री हंगामा करेल, असे चित्र रंगवले जात होते. मात्र प्रत्यक्षात अनेक कार्यकर्त्यांचा आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचाही भ्रमनिरास झाला. प्रत्येक गोष्टीचा बारीक ‘हिशेब’ देण्याची सवय नसणारे कार्यकर्ते दुरावल्या गेले. गावात आपल्या पक्षाचा कोण पदाधिकारी-कार्यकर्ता आहे याचीही माहिती नसल्याने ‘आम्हाला मानच दिला जात नाही’ म्हणून ते नाराज झाले. निवडणूक काय असते याचा अनुभव नसणाºया या डॉक्टर दाम्पत्याची त्यात चूक नसली तरी ज्येष्ठ मार्गदर्शकांनी दिलेल्या सूचनांचेही पालन करताना त्यांनी ‘हात’ आखडता घेतला. त्यामुळे त्यांच्या हाताला मतदार सढळ हाताने मतदान करतात की, तेसुद्धा आपला हात आखडता घेतात याची चर्चा सुरू आहे.
भाजप-काँग्रेसच्या या थेट लढतीत शेकाप, संभाजी ब्रिगेड, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार काही मते घेतील. शेकापच्या जयश्री वेळदा यांनी पक्षाची ताकद नसताना २०१४ ची निवडणूक लढली होती. पण यावेळी ग्रामीण भागात बºयापैकी नेटवर्क तयार करून शेकापने पुन्हा निवडणुकीत उडी घेतल्याने ते कोणाचे गणित बिघडवणार याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Maharashtra Election 2019 ; Which doctor will catch the pulse of voters?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.