Maharashtra Election 2019 ; कुणाची माघार? आज फैसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2019 06:00 AM2019-10-07T06:00:00+5:302019-10-07T06:00:30+5:30

निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांची सांपतिक स्थिती, शिक्षण आदी बाबी जनतेला माहित पडाव्या यासाठी निवडणूक लढणाऱ्या प्रत्येक उमेदवाराचे शपथपत्र निवडणूक विभागाच्या वेबसाईटवर अपलोड करावे लागते. विधानसभेसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची ४ ऑक्टोबर ही शेवटची तारीख होती. ५ ऑक्टोबर रोजी नामांकन अर्जांची छाननीची प्रक्रिया पूर्ण झाली.

Maharashtra Election 2019 ; Whose retreat? Decide today | Maharashtra Election 2019 ; कुणाची माघार? आज फैसला

Maharashtra Election 2019 ; कुणाची माघार? आज फैसला

googlenewsNext
ठळक मुद्दे४७ इच्छुकांपैकी काही गळणार : गडचिरोली-देसाईगंजमध्ये ३४ उमेदवार, शपथपत्र मात्र ११

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : तीनही विधानसभा मतदार संघांमध्ये निवडणूक लढण्यासाठी पात्र ठरलेल्या ४७ उमेदवारांपैकी किती जण निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेणार हे सोमवारी (दि.७) ठरणार आहे. यासोबत रिंगणात कायम राहिलेल्या उमेदवारांना दुपारी चिन्हांचे वाटपही होऊन प्रचाराला सुरूवात होणार आहे. दरम्यान गडचिरोली आणि देसाईगंज मतदार संघात ३४ उमेदवार रिंगणात असताना केवळ ११ उमेदवारांचे शपथपत्र निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर रविवारी दिसत असल्यामुळे उर्वरित उमेदवारांचे शपथपत्र कुठे गायब झाले? असा प्रश्न चर्चेचा विषय झाला होता.
निवडणुकीचा अर्ज भरल्यानंतर संबंधित उमेदवाराची माहिती निवडणूक विभागाच्या वेबसाईटवर अपलोड करावी लागते. मात्र आरमोरी व गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील एकूण ३४ उमेदवारांपैकी केवळ ११ उमेदवारांचे अर्ज अपलोड करण्यात आले आहेत. ही तांत्रिक गडबड आहे की लेटलतिफ कारभाराचा परिणाम, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात होता.
निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांची सांपतिक स्थिती, शिक्षण आदी बाबी जनतेला माहित पडाव्या यासाठी निवडणूक लढणाऱ्या प्रत्येक उमेदवाराचे शपथपत्र निवडणूक विभागाच्या वेबसाईटवर अपलोड करावे लागते. विधानसभेसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची ४ ऑक्टोबर ही शेवटची तारीख होती. ५ ऑक्टोबर रोजी नामांकन अर्जांची छाननीची प्रक्रिया पूर्ण झाली.
गडचिरोली व आरमोरी विधानसभा क्षेत्रातील सर्वच उमेदवारांचे नामांकन वैध ठरले आहेत. ५ आॅक्टोबर रोजी तरी शपथपत्र अपलोड केले जातील, अशी अपेक्षा जनता बाळगुण होती. मात्र शनिवार तर सोडाच रविवारी रात्री उशीरापर्यंत शपथपत्र अपलोड करण्यात आले नव्हते. आरमोरी विधानसभा क्षेत्रात १७ उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी केवळ तीन उमेदवारांचे शपथपत्र अपलोड केले आहेत, तर गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील १७ पैकी ८ उमेदवारांचे अर्ज अपलोड झाले आहेत. ९ उमेदवारांचे अर्ज अपलोड झालेच नाही.
शपथपत्रावर दिलेल्या माहितीवर अनेक जण आक्षेप घेतात. या आक्षेपावरून उमेदवाराची उमेदवारी धोक्यात येऊ शकते. एवढे शपथपत्राचे महत्त्व आहे. आपला उमेदवार कसा आहे हे सर्व जनतेला माहित व्हावे, या उद्देशाने शपथपत्र अपलोड करावे, असे निवडणूक विभागाचे निर्देश आहेत. मात्र असे असताना ४८ तासानंतरही शपथपत्र वेबसाईटवर का टाकले नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

भाजपमधील बंडखोरीकडे लक्ष
अहेरी मतदार संघात भाजपच्या तिकीटसाठी अनेक दिवस ज्यांचे नाव चालले त्या संदीप कोरेत यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. ते बजरंग दलाचे जिल्हा संयोजक होते. याशिवाय रा.स्व.संघाचे प्रचारक म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. त्यामुळे भाजपकडून त्यांच्या उमेदवारीसाठी बरेच प्रयत्न झाले. मात्र तिकीट न मिळाल्याने त्यांनी अपक्ष म्हणून नामांकन दाखल केले आहे. ते आपली उमेदवारी कायम ठेवतात की माघार घेतात याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

अहेरीचा कारभार गतिमान
अहेरी विधानसभा क्षेत्रात १३ उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले होते. त्यापैकी तीन उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत. उर्वरित सर्वच दहाही उमेदवारांचे शपथपत्र निवडणूक विभागाच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आले आहेत. आरमोरी व गडचिरोलीच्या तुलनेत अहेरीच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा कारभार गतिमान असल्याची भावना अनेक राजकीय पदाधिकाºयांनी व्यक्त केली.

Web Title: Maharashtra Election 2019 ; Whose retreat? Decide today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.