काेरची तालुक्यात १३ ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:37 AM2021-01-23T04:37:03+5:302021-01-23T04:37:03+5:30
तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींपैकी १८ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक घेण्यात आली होती. त्यापैकी ४ ग्रामपंचायतींमध्ये बिनविराेध निवडणूक झाली. बेळगाव, बेतकाठी, कोचीनारा, मर्केकसा, ...
तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींपैकी १८ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक घेण्यात आली होती. त्यापैकी ४ ग्रामपंचायतींमध्ये बिनविराेध निवडणूक झाली. बेळगाव, बेतकाठी, कोचीनारा, मर्केकसा, कोसमी-२, कोहका, मसेली, अल्लीटोला, सोनपूर व नागपूर अशा १३ ग्रामपंचायतींमध्ये महाविकास आघाडीचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले आहेत, असा दावा महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. कोटगुल, नांदळी, अरमुरकसा या तीन ग्रामपंचायतींवर भाजपने बाजी मारली आहे. बिहीटेकलामध्ये भाजपचे ४, महाविकास आघाडी ४ व एका अपक्षाने बाजी मारली आहे. अल्लीटाेला ग्रामपंचायतमध्ये फक्त ५ जागांवर निवडणूक घेण्यात आली. २ जागा रिक्त आहेत. या पाच जागांमध्ये महाविकास आघाडीचे ३ तर भाजपचे २ उमेदवार निवडून आले आहेत.
महाविकास आघाडीचे श्यामलाल मडावी, रमेश मानकर, प्रतापसिंग गजभिये, मनोज अग्रवाल, नंदकिशोर वैरागडे, कृष्णा नरडंगे, हकीम उद्दीन शेख, जगदीश कपुरडेरीया, राजेश नैताम, राहुल अंबादे, प्रमेशवर लोहंबरे, केशव लेनगुरे, राजाराम उईके, तुळशीराम ताळामी, कृष्णा कावळे, महेश झेरीया, बसंत भकता, कानताराम जमकातन, ईद्रजी सहारे, डॉ.नरेश देशमुख, राजू गुरनुले, तीलोचं हुपूंडी, मेहेरसिंग कांटेगे, देवालू कपुरडेहीया यांच्यासह विजयी उमेदवारांनी जल्लाेष केला.
पाेर्लात महाविकास पॅनलचे १० उमेदवार विजयी
गडचिराेली तालुक्यातील पाेर्ला ही माेठी ग्रामपंचायत आहे. १३ सदस्यीय ग्रामपंचायतीत १० सदस्य महाविकास पॅनलचे निवडून आले आहेत, असा दावा युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव विश्वजीत काेवासे यांनी केला आहे. महाविकास पॅनलच्या निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये प्रभाग क्र. १ मधून अजय श्यामराव चापले, रेखा रमेश शेंद्रे, अश्विनी पंकेश राऊत, प्रभाग क्र. ४ मधून सुजीत लालाजी राऊत, निवृत्ता संजय राऊत, प्रभाग क्र. २ मधून साेनू विवेक धानाेरकर, काजल मनाेज धानाेरकर हे उमेदवार निवडून आले आहेत. युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव विश्वजीत काेवासे, विधानसभा अध्यक्ष नितेश राठाेड, बंडू शनिवारे यांनी उमेदवारांचा सत्कार केला.