अनेकांची जनता कर्फ्यूतून माघार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 05:00 AM2020-09-30T05:00:00+5:302020-09-30T05:00:29+5:30

२८ सप्टेंबरपासून अहेरीत बंद पाळला जात आहे. मंगळवारी सलग दुसºयाही दिवशी बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. ४ आॅक्टोबरपर्यंत हा बंद पाळला जाणार आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी तसेच दुकानदारांनी बंदचा निर्णय घेतला. त्यामुळे अहेरीत बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. सोमवारपासूनच अहेरीतील किराणा दुकाने, जनरल स्टोर्स, कापड दुकाने, हार्डवेअरची दुकाने, हॉटेल्स, पानठेले, चहाची दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.

Many people withdraw from curfew | अनेकांची जनता कर्फ्यूतून माघार

अनेकांची जनता कर्फ्यूतून माघार

googlenewsNext
ठळक मुद्देअहेरीत कडकडीत बंद : कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी/देसाईगंज/आष्टी/आरमोरी : कोरोनाची संसर्ग साखळी तोडण्यासाठी गडचिरोली शहरानंतर अनेक ठिकाणी जनता कर्फ्यूची हाक देण्यात आली. मात्र गडचिरोली शहर आणि अहेरी वगळता अनेक ठिकाणी जनता कर्फ्यू पाळण्याबाबत दुमत बनत असल्यामुळे काही ठिकाणी काही व्यापाऱ्यांनी या निर्णयातून माघार घेतली आहे.
२८ सप्टेंबरपासून अहेरीत बंद पाळला जात आहे. मंगळवारी सलग दुसऱ्याही दिवशी बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. ४ आॅक्टोबरपर्यंत हा बंद पाळला जाणार आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी तसेच दुकानदारांनी बंदचा निर्णय घेतला. त्यामुळे अहेरीत बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. सोमवारपासूनच अहेरीतील किराणा दुकाने, जनरल स्टोर्स, कापड दुकाने, हार्डवेअरची दुकाने, हॉटेल्स, पानठेले, चहाची दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.
बाजारपेठ बंद असल्याने अहेरी शहरातील वाहनांची वर्दळ कमी झाली असल्याचे दिसून येत आहे. गर्दी कमी झाल्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यास मदत होणार आहे. केवळ आवश्यक कामासाठीच नागरिक घराबाहेर पडत असल्याचे दिसून येत आहे.

आरमोरीत संमिश्र प्रतिसाद
आरमोरी येथील बाजारपेठ २८ सप्टेंबरपासून ५ ऑक्टोबरपर्यंत सकाळी ८ ते २ वाजेपर्यंत चालू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. सोमवारी आरमोरी शहरातील बाजारपेठ साप्ताहित बंद राहते. मंगळवारी आरमोरीतील मोठी दुकाने सकाळपासूनच बंद होती. मात्र लहान दुकानदारांनी दुकाने सुरू केली. दुपारी २ वाजतानंतर संपूर्ण दुकाने बंद करण्यात आली. आरमोरीत बाजारपेठ बंद ठेवण्याबाबत अनेक गट पडले आहेत.

देसाईगंज व आष्टीतील जनता कर्फ्यू मागे
देसाईगंज शहरात सोमवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. मात्र या बंदला काही व्यापाऱ्यांचा विरोध होता. त्यामुळे बंदबाबत दुकानदारांमध्ये वादविवाद निर्माण झाले होते. २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी व्यापारी, दुकानदार, शहरातील प्रतिष्ठीत नागरिक यांची सिंधू भवनात बैठक आयोजित केली होती. या बैठकीत बहुतांश दुकानदारांनी बंदला कडाडून विरोध केला. त्यामुळे मंगळवारपासून बंद मागे घेण्याचे ठरविण्यात आले. शहरातील सराफा दुकानदारांनी मात्र दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रीक, हार्डवेअर, भांडे दुकानदारांसह कापड व्यावसायिक असोसिएशनने दि.४ पर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे भाजपचे तालुकाध्यक्ष राजू जेठाणी यांनी सांगितले. तर असोसिएशनमध्ये नसलेल्या व्यापाºयांनी दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे कापड व्यावसायिक हरिष मोटवानी यांनी सांगितले.
आष्टी येथील व्यापारी मंडळाच्या सदस्यांनी ३० सप्टेंबर ७ ऑक्टोबर या कालावधीत बंद पाळण्याचे ठरविले होते. याबाबत चामोर्शीचे तहसीलदार यांना निवेदन सुध्दा दिले होते. मात्र काही व्यापाऱ्यांनी बंदला विरोध दर्शविला होता. त्यामुळे पुन्हा मंगळवारी पोलीस स्टेशनमध्ये बैठक आयोजित केली होती. या बैठकीत बंद रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे ३० सप्टेंबरपासून आष्टी येथील दुकाने पूर्ववत सुरू राहतील. आष्टी येथे कोरोना रूग्णांची संख्या अतिशय कमी आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर बंद लादणे चुकीचे होईल, याचा विचार करीत बंद मागे घेण्यात आला, असे व्यापारी संघटनेने कळविले आहे. बैठकीला पोलीस निरिक्षक रजनिश निर्मल, सहायक पोलीस निरिक्षक धर्मेंद्र मडावी, पोलीस उपनिरिक्षक समू चौधरी, बिराजदार हजर होते.

Web Title: Many people withdraw from curfew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.