चामोर्शात प्रशासनाच्या वतीने मार्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:37 AM2021-04-16T04:37:10+5:302021-04-16T04:37:10+5:30
दिवसेंदिवस वाढत चाललेला कोरोना संसर्गं रोखण्यासाठी १४ एप्रिलच्या रात्री ८ वाजेपासून १ मेच्या ७ वाजेपर्यंत संचारबंदीत ...
दिवसेंदिवस वाढत चाललेला कोरोना संसर्गं रोखण्यासाठी १४ एप्रिलच्या रात्री ८ वाजेपासून १ मेच्या ७ वाजेपर्यंत संचारबंदीत कडक निर्बंध लावत राज्यात १४४ कलम लागू केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर तालुक्यात नियमांचे व अटी, शर्तीचे काटेकोर पालन करण्यासाठी १५ एप्रिल रोजी सकाळी महसूल विभाग, पोलीस विभाग व नगरपंचायत प्रशासन विभागाकडून नगर पंचायत प्रांगणापासून मुख्य बाजारपेठ, माता मांदिर , मार्कंडपुरा, वाल्मिकी चौक, वाळवंटी चैक, आंबेडकर चौक, दीप पेट्रोलपंप, बसस्टॅंड, हनुमाननगर, आष्टी टी पाईंट, मुख्य बाजारपेठमार्गे बाजार चौकात समारोप करण्यात आला.
शहरातील प्रमुख रस्त्याने संदेश देण्यासाठी रूट मार्च काढण्यात आला. त्यावेळी उपविभागीय अधिकारी उत्तम तोडसाम, तहसीलदार जितेंद्र शिकतोडे, पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक शंकर कुडावले, पो.उपनिरिक्षक निशा खोब्रागडे, पल्लवी वाघ, लेखापाल जगदीश नक्षीने, मोरेश्वर पेन्दाम,अभि. निखिल कारेकर, हाफीज सय्यद, मंडळ अधिकारी तारेश फुलझले, तलाठी नरेंद्र मेश्राम, साहिष कोडाप यांच्यासह नगरपंचायत, महसूलचे कर्मचारी उपस्थित होते.
===Photopath===
150421\15gad_2_15042021_30.jpg
===Caption===
चामाेर्शी शहरातून मार्च काढताना पाेलीस व इतर विभागाचे कर्मचारी