खासदारांनी घेतली जखमींची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 01:25 AM2019-01-20T01:25:41+5:302019-01-20T01:29:39+5:30

एटापल्ली मार्गावर गुरूपल्ली गावाजवळ १६ जानेवारी रोजी बुधवारला ट्रक व एसटी बसचा भिषण अपघात झाला. या अपघात चार जण जागीच ठार तर १५ जण जखमी झाले. खा.अशोक नेते यांनी एटापल्ली येथे जाऊन अपघातातील मृतक वनपाल प्रकाश अंबादे यांच्याघरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांचे सात्वन केले.

 Members of the injured took part in the meeting | खासदारांनी घेतली जखमींची भेट

खासदारांनी घेतली जखमींची भेट

googlenewsNext
ठळक मुद्देमृताच्या कुटुंबीयांचे सांत्वन : आर्थिक मदत मिळवून देण्याची ग्वाही

लोकमत न्यूज नेटवर्क
आलापल्ली : एटापल्ली मार्गावर गुरूपल्ली गावाजवळ १६ जानेवारी रोजी बुधवारला ट्रक व एसटी बसचा भिषण अपघात झाला. या अपघात चार जण जागीच ठार तर १५ जण जखमी झाले. खा.अशोक नेते यांनी एटापल्ली येथे जाऊन अपघातातील मृतक वनपाल प्रकाश अंबादे यांच्याघरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांचे सात्वन केले. तसेच ग्रामीण रुग्णालयात जाऊन जखमींची आस्थेने विचारपूस केली.
यावेळी भाजपचे जिल्हा महामंत्री रवींद्र ओल्लालवार, आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश गेडाम, जिल्हा उपाध्यक्ष बाबुराव गंपावार, माजी सभापती दीपक फुलसंगे, विस्तारक दामोदर अरगेला, जिल्हा सचिव विनोद आकनपल्लीवार, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष निखिल गादेवार, तालुकाध्यक्ष नवीन बाला, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष सुनीता चांदेकर, प्रसाद फुल्लुरवार, महागुराम उसेंडी, प्रांजू नागुलवार, जनार्धन नल्लवार, प्रवीण आत्राम व भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व युवा मोर्चा चे पदाधिकारी उपस्थित होते. मृतकाच्या वारसदारांना नोकरी मिळवून देण्याच तसेच जखमींना आर्थिक मदत मिळवून देण्याची ग्वाही खा.अशोक नेते यांनी यावेळी दिली.

Web Title:  Members of the injured took part in the meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.