गडचिरोली : गेल्या शनिवारी (दि. ३) छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाचे २२ जवान शहीद झाले होते. या चकमकीत चार नक्षली आणि एक नक्षल समर्थक (मिलिशिया सदस्य) मारल्या गेल्याची कबुली नक्षल्यांनी प्रसिद्धी पत्रकातून छत्तीसगडमधील प्रसार माध्यमांकडे दिली आहे. याचवेळी बेपत्ता असलेला जवान आपल्या ताब्यात असून त्याला सोडण्यासाठी मध्यस्थाचे नाव जाहीर करण्याचे आवाहनही त्यांनी सरकारला केले आहे.या चकमकीनंतर मारल्या गेलेल्या जवानांकडील शस्त्रे नक्षल्यांनी पळवून नेली. त्यात १४ अत्याधुनिक रायफली आणि दोन हजारावर काडतुसांचा समावेश आहे. त्याचा एक फोटोही दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचा प्रवक्ता विकल्प याने जारी केला आहे.जवानाला सोडण्यासाठी अटी नक्षल्यांच्या ताब्यात असलेल्या जवानाला सोडण्यासाठी त्यांनी काही अटी टाकल्या आहेत. त्यावर वाटाघाटी करण्यासाठी त्यांना मध्यस्थीची गरज भासत असल्याचे दिसून येते.
बेपत्ता जवान आमच्या ताब्यात, नक्षल्यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2021 1:28 AM