खासदार नेते यांनी पीपीई कीट घालून केली कोविड वाॅर्डाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:40 AM2021-05-25T04:40:35+5:302021-05-25T04:40:35+5:30
काेविड केअर सेंटरमधील पाहणीनंतर खासदार अशोक नेते यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांच्या सभागृहात प्रमुख वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जिल्ह्यातील कोविड स्थितीचा व ...
काेविड केअर सेंटरमधील पाहणीनंतर खासदार अशोक नेते यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांच्या सभागृहात प्रमुख वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जिल्ह्यातील कोविड स्थितीचा व सोयी-सुविधांचा आढावा घेतला. यावेळी भाजप जिल्हा महामंत्री रवींद्र ओल्लालवार, न.प. उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती अनिल कुनघाडकर, शहर महामंत्री विनोद देवोजवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल रुडे, कोविड केअर वाॅर्डाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नामदेव सोळंकी, डॉ. बागराज धुर्वे, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील ऑक्सिजन सिलिंडर, वॅक्सिन, व्हेंटिलेटर, रेमडेसिविर इंजेक्शन व इतर औषधोपचार साहित्य व औषधांच्या पुरवठ्याबाबत डाॅक्टरांनी माहिती दिली. जिल्ह्यातील बाराही तालुक्यांत वेळेवर औषधी पुरवठा करून नागरिकांना योग्य आरोग्य सेवा पुरवावी, कोरोना आजाराबाबत जिल्ह्यातील दुर्गम भागात जनजागृती करून रुग्णांवर वेळीच उपचार करावेत, तसेच रुग्णांना चांगली वागणूक मिळण्यासाठी परिचारिकांना निर्देश द्यावेत, अशा सूचना खासदारांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
===Photopath===
240521\24gad_1_24052021_30.jpg
===Caption===
आराेग्य अधिकाऱ्यांशी चर्चा करताना खा. अशाेक नेते.