लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : खासदार अशोक नेते यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत जिल्ह्यातील समस्यांवर चर्चा केली. मागण्यांचे निवेदन सादर केले.खासदार अशोक नेते यांनी पंतप्रधानांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गडचिरोली जिल्हा जंगलव्याप्त व अविकसीत आहे. जिल्ह्यात ७२ टक्के जंगल आहे. वनकायद्यामुळे सिंचन प्रकल्प रखडले आहेत. तसेच नवीन प्रकल्प निर्माण करतांनाही अडचण जात आहे. वनकायद्यात शिथीलता आणल्यास अनेक समस्या मार्गी लागतील. नागरिकांना चांगली आरोग्य सेवा मिळण्यासाठी मेडीकल कॉलेज देण्यात यावा. वनपट्टे वाटपासाठी गैरआदिवासींना ७५ वर्षांची अट घालण्यात आली आहे. ही अट रद्द करावी. वैनगंगा नदीवर प्रत्येक पाच ते दहा किमी अंतरावर बंधारे बांधावे. सुरक्षेच्या कारणावरून सुरजागड प्रकल्पातील लोहखनिज खनन बंद झाले आहे. वाहतूक करणाऱ्या ट्रकांना सुरक्षा पुरविण्यात यावी. हा प्रकल्प सुरू झाल्यास रोजगाराची समस्या सुटण्यास मदत होईल.आष्टी येथील पेपरमिल सुरू करावे. गडचिरोली-देसाईगंज रेल्वे मार्गाच्या कामाला सुरूवात करावी. चामोर्शी तालुक्यातील मार्र्कं डादेव येथील मंदिराच्या जीर्णाेद्धाराचे काम तत्काळ करावे अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेल्या निवेदनातून खासदारांनी केली आहे.समस्या सोडविण्याचे आश्वासनमागण्यांचे निवेदन सादर केल्यानंतर खासदारांनी पंतप्रधानांसोबत चर्चा केली. या समस्या सोडविण्यासाठी संबंधित विभागांना निर्देश दिले जातील असे आश्वासन पंतप्रधानांनी खासदारांना दिले. यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याचा सल्लाही पंतप्रधानांनी खासदारांना दिला.
खासदार नेतेंची पंतप्रधानांसोबत चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2019 12:12 AM
खासदार अशोक नेते यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत जिल्ह्यातील समस्यांवर चर्चा केली. मागण्यांचे निवेदन सादर केले. खासदार अशोक नेते यांनी पंतप्रधानांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गडचिरोली जिल्हा जंगलव्याप्त व अविकसीत आहे.
ठळक मुद्देसंडे अँकर । गडचिरोलीतील समस्यांचे निवेदन