लोकमत न्यूज नेटवर्कमानापूर/देलनवाडी : आरमोरी तालुक्यातील देलनवाडी येथे लगतच्या खोब्रागडी नदीवरून नळ योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. परंतु पावसाळ्याच्या दिवसात नळाद्वारे गढूळ पाणीपुरवठा केला जातो. सध्या गावात पाणीपुरवठा होत असल्याने विहिरीचे खोलीकरण करण्यासाठी जुन्या विहिरीतील पाण्याची क्षमता तपासणीकरिता दोन दिवसांपासून नळ योजना बंद करण्यात आली आहे. त्यामुळे पाणी भरण्यासाठी विहिरीवर महिलांची गर्दी होत आहे.देलनवाडी येथे पावसाळा वगळून अनेक नागरिक वर्षभर नळ योजनेच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करतात. गावातील टाकीमध्ये खोब्रागडी नदीवरील विहिरीतून पाईपद्वारे पाणी आणून साठविले जाते. त्यानंतर गावात पुरवठा केला जातो. परंतु सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने नळाद्वारे गढूळ पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे अनेक नागरिक तुरटी फिरवून पाणी शुद्ध करतात. परंतु प्रत्येक वेळी पाणी शुद्ध होईलच, असे नाही. त्यामुळे येथे जलशुद्धीकरण यंत्र बसविण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने जलप्राधिकरण, खासदार, आमदार व जिल्हा परिषदेकडे पत्रव्यवहार केला. परंतु दुर्लक्ष झाले. ग्रामपंचायत प्रशासन जलशुद्धीकरण यंत्र खरेदी करेल एवढी क्षमता नाही. उत्पन्नाचे स्त्रोत नसल्याने शासनाच्या निधीतूनच जलशुद्धीकरण यंत्र खरेदी करावे लागणार आहे. याशिवाय नदीकाठावरील जुन्या विहिरीतून चांगल्या पाण्याचा पुरवठा होऊ शकतो. परंतु त्या विहिरीत पुरेसे पाणी उपलब्ध नाही.या विहिरीत बोअर मारल्यास पाण्याची पातळी वाढू शकते. त्याकरिता प्रयोग म्हणून जुन्या विहिरीचे पाणी आटवून या पाण्याची क्षमता तपासण्याकरिता मागील दोन दिवसांपासून देलनवाडी येथील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पाणी भरण्यासाठी महिला विहिरीवर गर्दी करीत आहेत. जिल्हा प्रशासनाने लक्ष घालून देलनवाडी गावासाठी जलशुद्धीकरण यंत्र उपलब्ध करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
देलनवाडी गावात गढूळ पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2020 5:00 AM
लोकमत न्यूज नेटवर्क मानापूर/देलनवाडी : आरमोरी तालुक्यातील देलनवाडी येथे लगतच्या खोब्रागडी नदीवरून नळ योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. परंतु ...
ठळक मुद्देजलशुद्धीकरण यंत्र बसविण्याची मागणी । क्षमता तपासणीसाठी दोन दिवसांपासून नळ योजना बंद