लोकमत न्यूज नेटवर्कआलापल्ली : तीन दिवसांपूर्वी नागेपल्ली येथील एका व्यक्तीला कोरोना सदृश्य लक्षणे आढळून आली. त्यामुळे त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने नागेपल्ली गावाच्या सीमा सिल केल्या आहेत.आलापल्ली गावाला लागूनच असलेल्या नागेपल्ली येथील कालीमाता मंदिर परिसरातील एका व्यक्तीला कोरोना संशयीत म्हणून पुढील उपचारासाठी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले आहे. त्याची टेस्ट रिपोर्ट अजूनपर्यंत प्राप्त झालेली नाही. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून या गावाकडे जाणारे संपूर्ण रस्ते सिल करण्यात आले आहेत. आलापल्ली ते अहेरी, आलापल्ली ते आष्टी या प्रमुख मार्गांचा समावेश आहे. गावात जाणाऱ्या चारही मार्गांवर पोलीस विभागाने तपासणी नाके उभारले आहेत. पोलीस कर्मचारी नागेपल्ली येथे कुणालाही प्रवेश करू देत नाही. तसेच नागेपल्ली येथील व्यक्तीला बाहेर सुद्धा जाऊ दिले जात नाही. उपविभागीय पोलीस अधिकारी बजरंग देसाई यांनी या नाक्यांना नुकतीच भेट देऊन पाहणी केली. नाक्यावरील पोलीस कर्मचाऱ्यांना सूचना केल्या.गावातील नागरिकांची आरोग्य तपासणीअहेरीचे तहसीलदार ओंकार ओतारी यांना विचारले असता, नागेपल्ली येथे संशयीत रुग्ण आढळल्याने त्या परिसरातील नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्या परिसरातील नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाते. आरोग्य विभाग सतर्क असून नागरिकांनी घाबरू नये, स्वत:ची काळजी घ्यावी, अफवा पसरवू नये तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन अहेरीचे तहसीलदार ओंकार ओतारी यांनी नागेपल्लीवासीयांना केले आहे.
नागेपल्लीच्या सीमा केल्या सिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 5:00 AM
खबरदारीचा उपाय म्हणून या गावाकडे जाणारे संपूर्ण रस्ते सिल करण्यात आले आहेत. आलापल्ली ते अहेरी, आलापल्ली ते आष्टी या प्रमुख मार्गांचा समावेश आहे. गावात जाणाऱ्या चारही मार्गांवर पोलीस विभागाने तपासणी नाके उभारले आहेत. पोलीस कर्मचारी नागेपल्ली येथे कुणालाही प्रवेश करू देत नाही. तसेच नागेपल्ली येथील व्यक्तीला बाहेर सुद्धा जाऊ दिले जात नाही.
ठळक मुद्देखबरदारीचा उपाय : संशयित रुग्ण आढळल्याने पोलीस विभागाने बसविल्या चौक्या