दक्षिण गडचिरोलीत नक्षल्यांचा धुडगूस सुरूच; आज बंदची हाक, झाड तोडून रस्त्यावर टाकले, पोस्टरही लावले

By संजय तिपाले | Published: December 22, 2023 09:53 AM2023-12-22T09:53:28+5:302023-12-22T09:53:54+5:30

बिहार, झारखंड, उत्तर प्रेदशातील प्रतिक्रांतिकारी हल्ल्यांविरोधात २२ डिसेंबर रोजी माओवादी संघटनेने भारत बंदची हाक दिली होती.

Naxals' rampage continues in South Gadchiroli; Calling for bandh today, trees were cut and thrown on the road, posters were also put up | दक्षिण गडचिरोलीत नक्षल्यांचा धुडगूस सुरूच; आज बंदची हाक, झाड तोडून रस्त्यावर टाकले, पोस्टरही लावले

दक्षिण गडचिरोलीत नक्षल्यांचा धुडगूस सुरूच; आज बंदची हाक, झाड तोडून रस्त्यावर टाकले, पोस्टरही लावले

गडचिरोली : बिहार, झारखंड, उत्तर प्रेदशातील प्रतिक्रांतिकारी हल्ल्यांविरोधात २२ डिसेंबर रोजी माओवादी संघटनेने भारत बंदची हाक दिली होती. या पार्श्वभूमीवर गुरुवारी रात्री नक्षल्यांनी दक्षिण गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यात झाड तोडून रस्त्यावर टाकले तर पोस्टर लावून जनआंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात नक्षल्यांचा पीएलजीए सप्ताह झाला. यात तीन निष्पाप नागरिकांची हत्या केल्याने खळबळ उडाली होती. २१ डिसेंबर रोजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना तोडगट्टा आंदोलनावरून इशारा देणारे पत्रक जारी करणाऱ्या नक्षल्यांचा दक्षिण गडचिरोलीमध्ये धुडगूस सुरूच आहे. गुरुवारी रात्री नक्षल्यांनी भामरागड - आलापल्ली रस्त्यावरील बेजूर फाट्यालगत झाड तोडून रस्त्यावर टाकले तर भामरागड- लाहेरी रोडवर पोस्टर लावल्याचा प्रकार समोर आला. झाड रस्त्यावर टाकल्याने भामरागड- आलापल्ली रस्ता काही वेळ बंद होता. पोलिसांनी झाड हटवून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला.

परिसरात दहशत

दक्षिण गडचिरोलीमध्ये नक्षली पुन्हा सक्रिय झाल्याने दहशत निर्माण झाली आहे. भारत बंदच्या आवाहनानंतर पोलीस सतर्क झाले होते. नक्षल्यांचा मुकाबला करण्यासाठी पोलिसांनी देखील व्यूहरचना आखली असून नक्षलविरोधी अभियान गतिमान केले आहे.

Web Title: Naxals' rampage continues in South Gadchiroli; Calling for bandh today, trees were cut and thrown on the road, posters were also put up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.