पाणीसाठ्याचे संवर्धनाविषयी शिक्षणाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 11:33 PM2018-12-13T23:33:45+5:302018-12-13T23:36:42+5:30
नैसर्गिक संसाधनांचा मानव व संपूर्ण प्राणीमात्रांशी संबंध आहे. विकासक्रम निरंतर राहण्याकरिता जल, जमीन, जंगल या संसाधनांची गरज आहे. या परिसरात नैसगिक साठे भरपूर आहेत. भविष्याच्या पिढीसाठी जलसाठे कायम ठेवायचे असल्यास पाण्याच्या साठ्याचे संवर्धन व पुनर्भरण संदर्भात शिक्षणाची गरज आहे,..........
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : नैसर्गिक संसाधनांचा मानव व संपूर्ण प्राणीमात्रांशी संबंध आहे. विकासक्रम निरंतर राहण्याकरिता जल, जमीन, जंगल या संसाधनांची गरज आहे. या परिसरात नैसगिक साठे भरपूर आहेत. भविष्याच्या पिढीसाठी जलसाठे कायम ठेवायचे असल्यास पाण्याच्या साठ्याचे संवर्धन व पुनर्भरण संदर्भात शिक्षणाची गरज आहे, असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर यांनी केले आहे.
जलसंसाधन मंत्रालय, केंद्रीय भूमीजल बोर्ड नागपूर व श्री गो. ना. मुनघाटे महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या सभागृहात पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण व भूजल व्यवस्थापन या विषयावर दोन दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी उद्घाटनिय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून कुलगुरू कल्याणकर बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन सहकार महर्षी अरविंद पोरेड्डीवार यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून भूजल वैज्ञानिक केंद्रीय भूजल बोर्डाचे अधीक्षक डॉ.प्रभातकुमार जैन, प्राचाय डॉ. राजाभाऊ मुनघाटे, डॉ. भूषण लामसोगे, डॉ. गुणवंत वडपल्लीवार, उपप्राचार्य प्रा. पी. एस. खोपे, डॉ. संदीप निवडंगे आदी मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनिय भाषणादरम्यान मार्गदर्शन करताना अरविंद पोरेड्डीवार म्हणाले, जिल्ह्यात नैसर्गिक बारमाही वाहणारे अधिक नद्या, नाले, झरणे आहेत. त्यासाठी सिंचनाची व्यवस्था नाही. येथून वाहणाऱ्या नदीवर नजिकच्या तेलंगणा राज्यात मोठा सिंचन प्रकल्प उभा होत आहे. मात्र येथील लोकप्रतिनिधींना हे साध्य करता आले नाही, अशी खंत पोरेड्डीवार यांनी व्यक्त केली. डॉ. प्रभातकुमार जैन यांनी मार्गदर्शन करताना या देशात संसाधनांच्या तुलनेत लोकसंख्या अधिक आहे. त्यामुळे सिमीत असलेल्या पाण्याचे नियोजनबध्द ताळेबंद तयार करीत वापर होणे गरजेचे असल्याचे सांगितले.
शेतकºयांकरिता पाच सत्रात आयोजित कार्यशाळेत केंद्रीय भूजल मध्यक्षेत्र नागपूर येथील वैज्ञानिक डॉ. हरीभाऊ काळे, डॉ. अश्विन आटे, डॉ. राहूल शेंडे, डॉ. नितीन झाडे, प्रशांत गोंगले, तुकेश सयाम, डॉ. भूषण लामसोगे यांनी भूजल पुनर्भरण, भूजल व्यवस्थापन, पाण्याचे टाळेबंद, ठिबक सिंचनाद्वारे पाण्याचे व्यवस्थापन, गरज व फायदे या विषयावर मार्गदर्शन केले. संचालन डॉ. नरेंद्र आरेकर तर आभार डॉ. गुणवंत वडपल्लीवार यांनी मानले. मान्यवरांनी नवरगाव येथे भेट देऊन भूजल सर्वेक्षण तसेच बंधारा व्यवस्थापन यावर प्रात्यक्षिक सादर करून मार्गदर्शन केले.