न.प. शाळेतील विद्यार्थ्यांना मास्कचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:55 AM2021-02-23T04:55:03+5:302021-02-23T04:55:03+5:30

गडचिरोली : एकीकडे कोरोनाची लसीकरण मोहीम राज्यभर सुरू झाली असली तरी कोरोनाचा संसर्ग थांबता थांबत नाही, अशी परिस्थिती संपूर्ण ...

N.P. Distribution of masks to school students | न.प. शाळेतील विद्यार्थ्यांना मास्कचे वितरण

न.प. शाळेतील विद्यार्थ्यांना मास्कचे वितरण

Next

गडचिरोली : एकीकडे कोरोनाची लसीकरण मोहीम राज्यभर सुरू झाली असली तरी कोरोनाचा संसर्ग थांबता थांबत नाही, अशी परिस्थिती संपूर्ण राज्यासह आपल्या जिल्ह्यातही निर्माण झाली आहे. जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आणखी वाढण्यास प्रारंभ झाल्याने जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले. दरम्यान या पार्श्वभूमीवर २० फेब्रुवारी रोजी शहरातील नगर परिषद शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांना नगर परिषदेच्या वतीने नगराध्यक्ष योगिता पिपरे यांच्या हस्ते ऑक्सिमीटर, थर्मल गन व मास्कचे वितरण करण्यात आले.

यावेळी न.प. उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, शिक्षण सभापती वर्षा नैताम, मुख्याधिकारी संजीव ओहाेड, न.प. शिक्षण विभागाचे बंडू ताकसांडे उपस्थित होते. शहरातील नगर परिषद उच्च प्राथ. शाळा रामपूर, महात्मा गांधी न.प. शाळा फुले वाॅर्ड तर जवाहरलाल नेहरू न.प. उच्च प्राथ. डिजिटल शाळा रामनगर येथील प्रत्येक शाळेमध्ये एक असे एकूण तीन ऑक्सिमीटर, तीन थर्मल गन तर प्रत्येक शिक्षक व विद्यार्थ्यांना मास्कचे वाटप करण्यात आले.

यावेळी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा रामपूर येथील सहायक शिक्षक वीरेंद्र सोनवाणे, माधुरी निंबोरकर, सरिता नरोटे, रूपाली पवनकर, महात्मा गांधी न.प. प्राथमिक शाळा फुले वाॅर्ड येथील सहायक शिक्षक श्रीपाद बन्सोड, सी. एम. राजगडे तर जवाहरलाल नेहरू न.प. उच्च प्राथमिक डिजिटल शाळा रामनगर येथील मुख्याध्यापक सुधीर गोहणे, सहायक शिक्षक महेंद्र शेडमाके, शर्मिला मने, रंजना शेडमाके, ललिता मस्के, सुलभा देवांग, लिमेश जांभुळे, जयश्री पिसे, माधुरी बोकडे, सूर्यकांत मडावी, शोभा कुमरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मधुकर नैताम यांच्यासह शाळेतील कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: N.P. Distribution of masks to school students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.