ओबीसींचा जिल्हाभरात घंटानाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2020 05:00 AM2020-10-09T05:00:00+5:302020-10-09T05:00:28+5:30
२०२१ मध्ये होणाऱ्या जनगणनेत ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, मराठा समाजाला ओबीसींचे आरक्षण देऊ नये, चंद्रपूर-गडचिरोली, यवतमाळ, नंदूरबार, धुळे, नाशिक, पालघर या जिल्ह्यातील आरक्षण पूर्ववत १९ टक्के करावे, ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह सुरू करावे, महाज्योती संस्थेकरिता एक हजार कोटी रुपयांची तरतूद करावी, ओबीसी समाजाचा रिक्त पदांचा अनुशेष भरावा, पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करावे, स्वतंत्र घरकूल योजना सुरू करावी, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : ओबीसींच्या विविध मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या नेतृत्वात जिल्हाभरात गुरूवारी घंटानाद आंदोलन करण्यात आले. गडचिरोली येथे इंदिरा गांधी चौकातून रॅली काढून खासदारांच्या जनसंपर्क कार्यालयावर धडक देऊन घंटानाद करण्यात आला.
२०२१ मध्ये होणाऱ्या जनगणनेत ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, मराठा समाजाला ओबीसींचे आरक्षण देऊ नये, चंद्रपूर-गडचिरोली, यवतमाळ, नंदूरबार, धुळे, नाशिक, पालघर या जिल्ह्यातील आरक्षण पूर्ववत १९ टक्के करावे, ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह सुरू करावे, महाज्योती संस्थेकरिता एक हजार कोटी रुपयांची तरतूद करावी, ओबीसी समाजाचा रिक्त पदांचा अनुशेष भरावा, पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करावे, स्वतंत्र घरकूल योजना सुरू करावी, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
गडचिरोली येथील आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे उपाध्यक्ष शेषराव येलेकर, जिल्हाध्यक्ष दादाराव चुधरी, सचिव प्रा. देवानंद कामडी, नगरसेवक रमेश भुरसे, सुरेश भांडेकर, विलास पारखी, जनार्धन ताकसांडे, रा. ना. ताजने, सुरेश लडके, दत्तात्रय खरवडे, पुरूषोत्तम झंझाळ, पंडीत पुळके, मनोज राजुरकर, शरद निंबोरकर, कमलाकर रडके, दिलीप खेवले, दादाजी चापले, पांडुरंग घोटेकर, बंडू सातपुते, सुधाकर दुधबावरे, विवेक बाबणवाडे, सतिश विधाते, अतुल बोमनवार यांनी केले.
ओबीसींच्या मागण्या मान्य न केल्यास भविष्यात देशभरात टप्प्याटप्प्याने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. मागण्यांचे निवेदन खासदारांमार्फत केंद्र शासनाला पाठविले जाणार आहे.