तैलचित्र अनावरण

By admin | Published: July 28, 2014 11:31 PM2014-07-28T23:31:28+5:302014-07-28T23:31:28+5:30

गडचिरोली जिल्ह्याच्या विकासात सहकार क्षेत्राचे मोठे योगदान आहे. या जिल्ह्याला दिशा देण्याचे काम पोरेड्डीवार कुटुंबीयांनी केले. अनेक आव्हानांचा सामना करीत जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर

Oil paintings unveil | तैलचित्र अनावरण

तैलचित्र अनावरण

Next

देवतळे यांचे प्रतिपादन : जिल्हा विकासाला दिली पोरेड्डीवारांनी दिशा
आरमोरी : गडचिरोली जिल्ह्याच्या विकासात सहकार क्षेत्राचे मोठे योगदान आहे. या जिल्ह्याला दिशा देण्याचे काम पोरेड्डीवार कुटुंबीयांनी केले. अनेक आव्हानांचा सामना करीत जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर आदिवासी यांना न्याय देण्यात आला. पोरेड्डीवार परिवाराची तिसरी पिढीही या कामात अग्रेसर आहे, असे प्रतिपादन राज्याचे पर्यावरण व सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे यांनी केले.
आरमोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्थापनेला ५० हून अधिक वर्ष झाल्याचे औचित्य साधून बाजार समितीच्या सभागृहात माजी आमदार स्व. नामदेवराव सावकार पोरेड्डीवार यांच्या तैलचित्राचे अनावरण व गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आरमोरी येथील शाखेच्या आर्थिक साक्षरता केंद्राचे उद्घाटन तसेच ‘वैरागडचा इतिहास’ या पुस्तकाच्या विमोचन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे सदस्य प्रा. जोगेंद्र कवाडे होते. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ काँग्रेस नेते अरविंद पोरेड्डीवार, आमदार आनंदराव गेडाम, माजी आमदार पेंटारामा तलांडी, ज्येष्ठ नेते सुधीर भातकुलकर, नागरी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पोरेड्डीवार जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, किशोर वनमाळी, पं. स. सभापती अशोक वाकडे, कृउबासचे सभापती खिळसागर नाकाडे, पीरिपाचे नागपूर अध्यक्ष अरूण गजभिये, बँकेचे सचिव त्रियोगी दुबे, मुन्नीश्वर बोरकर, प्राचार्य खुशाल वाघरे, बबलू शेठ आदी उपस्थित होते. याप्रसंगी आ. जोगेंद्र कवाडे म्हणाले की, जाती आणि मातीच्या पलिकडे जाऊन समता, बंधुता व एकोपा तसेच सर्वांना एकत्र घेऊन चालण्याचा वारसा नामदेवराव पोरेड्डीवारांपासून दुसरी आणि तिसरी पिढी चालवित आहे. गडचिरोली जिल्हा निर्माण होण्यापूर्वी चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू हे आरमोरी होते. सर्वसामान्यांना छातीशी कवटाळून प्रेम देण्याचे काम पोरेड्डीवारांनी केले, असे प्रा. कवाडे म्हणाले. दरम्यान प्रकाश पोरेड्डीवार यांच्या हस्ते प्रा जोगेंंद्र कवाडे यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कृषी उत्पन्न बाजार समिती व भंडारेश्वर देवस्थानच्यावतीने ना. देवतळे, प्रा. कवाडे यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्रंचित पोरेड्डीवार यांनी केले. संचालन प्रा. नरेंद्र आरेकर, तर आभार अरविंद पोरेड्डीवार यांनी मानले. (प्रतिनिधी)

Web Title: Oil paintings unveil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.