शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
2
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
3
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
4
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
5
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
6
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
7
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
8
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
9
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
10
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
11
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
12
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
13
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
14
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
15
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
16
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
17
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
18
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?
19
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
20
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ

तैलचित्र अनावरण

By admin | Published: July 28, 2014 11:31 PM

गडचिरोली जिल्ह्याच्या विकासात सहकार क्षेत्राचे मोठे योगदान आहे. या जिल्ह्याला दिशा देण्याचे काम पोरेड्डीवार कुटुंबीयांनी केले. अनेक आव्हानांचा सामना करीत जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर

देवतळे यांचे प्रतिपादन : जिल्हा विकासाला दिली पोरेड्डीवारांनी दिशाआरमोरी : गडचिरोली जिल्ह्याच्या विकासात सहकार क्षेत्राचे मोठे योगदान आहे. या जिल्ह्याला दिशा देण्याचे काम पोरेड्डीवार कुटुंबीयांनी केले. अनेक आव्हानांचा सामना करीत जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर आदिवासी यांना न्याय देण्यात आला. पोरेड्डीवार परिवाराची तिसरी पिढीही या कामात अग्रेसर आहे, असे प्रतिपादन राज्याचे पर्यावरण व सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे यांनी केले.आरमोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्थापनेला ५० हून अधिक वर्ष झाल्याचे औचित्य साधून बाजार समितीच्या सभागृहात माजी आमदार स्व. नामदेवराव सावकार पोरेड्डीवार यांच्या तैलचित्राचे अनावरण व गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आरमोरी येथील शाखेच्या आर्थिक साक्षरता केंद्राचे उद्घाटन तसेच ‘वैरागडचा इतिहास’ या पुस्तकाच्या विमोचन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे सदस्य प्रा. जोगेंद्र कवाडे होते. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ काँग्रेस नेते अरविंद पोरेड्डीवार, आमदार आनंदराव गेडाम, माजी आमदार पेंटारामा तलांडी, ज्येष्ठ नेते सुधीर भातकुलकर, नागरी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पोरेड्डीवार जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, किशोर वनमाळी, पं. स. सभापती अशोक वाकडे, कृउबासचे सभापती खिळसागर नाकाडे, पीरिपाचे नागपूर अध्यक्ष अरूण गजभिये, बँकेचे सचिव त्रियोगी दुबे, मुन्नीश्वर बोरकर, प्राचार्य खुशाल वाघरे, बबलू शेठ आदी उपस्थित होते. याप्रसंगी आ. जोगेंद्र कवाडे म्हणाले की, जाती आणि मातीच्या पलिकडे जाऊन समता, बंधुता व एकोपा तसेच सर्वांना एकत्र घेऊन चालण्याचा वारसा नामदेवराव पोरेड्डीवारांपासून दुसरी आणि तिसरी पिढी चालवित आहे. गडचिरोली जिल्हा निर्माण होण्यापूर्वी चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू हे आरमोरी होते. सर्वसामान्यांना छातीशी कवटाळून प्रेम देण्याचे काम पोरेड्डीवारांनी केले, असे प्रा. कवाडे म्हणाले. दरम्यान प्रकाश पोरेड्डीवार यांच्या हस्ते प्रा जोगेंंद्र कवाडे यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कृषी उत्पन्न बाजार समिती व भंडारेश्वर देवस्थानच्यावतीने ना. देवतळे, प्रा. कवाडे यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्रंचित पोरेड्डीवार यांनी केले. संचालन प्रा. नरेंद्र आरेकर, तर आभार अरविंद पोरेड्डीवार यांनी मानले. (प्रतिनिधी)