कौसर खान ।लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सिरोंचा तालुक्यात १ हजार १७३ घरे बांधण्याचे उदिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी केवळ २२६ घरांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. एकूण घरांच्या तुलनेत केवळ १९.२७ टक्के घरे पूर्ण झाली आहेत.देशातील प्रत्येक कुटुंबाला पक्के घर उपलब्ध व्हावे, या उद्देशाने केंद्र शासनामार्फत प्रधानमंत्री आवास योजना राबविली जात आहे. या योजनेंतर्गत ज्या कुटुंबाचे घर कच्चे आहे , त्याला पक्के घर बांधून देण्यासाठी दीड लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. दिड लाख रुपयांमध्ये घराचे बांधकाम शक्य नाही. मात्र लाभार्थी स्वत:कडचे पैसे टाकून घराचे स्वप्न पूर्ण करतात. विशेष करून ज्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे, असे नागरिक तर शासनाकडून अनुदान उपलब्ध झाल्याशिवाय घरकुलाच्या बांधकामाला सुरूवात करीत नाही. त्यामुळे शासनाकडून घरकुलासाठी अनुदान मिळणे हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे.२०१९-२० या आर्थिक वर्षात सिरोंचा तालुक्याला १ हजारर १७३ घरे बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होत. त्यापैकी १ हजार ८९ घरे मंजूर करण्यात आली. १ हजार ७० लाभार्थ्यांना पहिला हप्ता मंजूर करण्यात आला. घरकुलाचे बांधकाम विशिष्ट स्तरापर्यंत गेल्यानंतरच दुसरा, तिसरा व चौथा हप्ता दिला जाते. ६७७ लाभार्थ्यांना दुसरा हप्ता, ४०५ लाभार्थ्यांना तिसरा हप्ता व २०५ लाभार्थ्यांना चौथा हप्ता दिला आहे. हप्ता वितरणावरून घरांच्या बांधकामांच्या स्थितीचा अंदाज येण्यास मदत होते. मागील वर्षीपासून जिल्हाभरात रेती घाटांचे लिलाव झाले नाहीत. चोरीची रेती दामदुपटीने खरेदी करावी लागते. एवढे पैसे संबंधित लाभार्थ्याकडे राहत नाही. त्यामुळे अनेकांनी घरांचे बांधकाम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी सुध्दा रेती घाटांचे लिलाव झाले नाहीत. त्यामुळे घरांची बांधकामे ठप्प पडण्याचा धोका आहे.२२१ घरांना सुरूवातच नाही२२१ लाभार्थ्यांनी वर्षभराचा कालावधी उलटून अजूनपर्यंत घरांच्या बांधकामाला सुरूवात सुध्दा केली नाही. यातील बहुतांश लाभार्थ्यांनी मात्र पहिला हप्ता उचलला आहे. काही लाभार्थी घरकुलाची रक्कम उचल केल्यानंतर ती रक्कम दुसऱ्या कामासाठी वापरतात. त्यामुळे घराचे काम रखडले आहे.रमाईच्या लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याची प्रतीक्षारमाई घरकूल याजनेंतर्गत सिरोंचा तालुक्यात ३४२ घरकूल मंजूर करण्यात आली आहेत. मात्र यातील एकाही लाभार्थ्याला शासनाने पहिला हप्ता मंजूर केला नाही. त्यामुळे वर्षभराचा कालावधी उलटून सुध्दा एकाही घराला सुरूवात झाली नाही. दरवर्षीच्या तुलनेत दोन ते तीन पटीने रमाई घरकूल योजनेंतर्गत घरकूल मंजूर केले आहेत. मात्र त्यांना निधी दिला नाही.
सिरोंचा तालुक्यातील १९ टक्केच घरे पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 5:00 AM
२०१९-२० या आर्थिक वर्षात सिरोंचा तालुक्याला १ हजारर १७३ घरे बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होत. त्यापैकी १ हजार ८९ घरे मंजूर करण्यात आली. १ हजार ७० लाभार्थ्यांना पहिला हप्ता मंजूर करण्यात आला. घरकुलाचे बांधकाम विशिष्ट स्तरापर्यंत गेल्यानंतरच दुसरा, तिसरा व चौथा हप्ता दिला जाते. ६७७ लाभार्थ्यांना दुसरा हप्ता, ४०५ लाभार्थ्यांना तिसरा हप्ता व २०५ लाभार्थ्यांना चौथा हप्ता दिला आहे. हप्ता वितरणावरून घरांच्या बांधकामांच्या स्थितीचा अंदाज येण्यास मदत होते.
ठळक मुद्देदामदुप्पट दराने रेती खरेदी अशक्य : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत लाभ