रेल्वे मार्गासाठी खासगी जमीनच अधिक लागणार

By admin | Published: April 30, 2017 12:43 AM2017-04-30T00:43:58+5:302017-04-30T00:43:58+5:30

देसाईगंज-गडचिरोली मार्गासाठी वन विभागाची ६९.४ हेक्टर तर शासनाची १२.६३ हेक्टर आणि खासगी १२५.९१ हेक्टर जमीन लागणार आहे.

Only private land will be required for the railway route | रेल्वे मार्गासाठी खासगी जमीनच अधिक लागणार

रेल्वे मार्गासाठी खासगी जमीनच अधिक लागणार

Next

गडचिरोली : देसाईगंज-गडचिरोली मार्गासाठी वन विभागाची ६९.४ हेक्टर तर शासनाची १२.६३ हेक्टर आणि खासगी १२५.९१ हेक्टर जमीन लागणार आहे. या रेल्वे मार्गाला ४०१ कोटी रूपये खर्च येणार असून ६१ कोटी रूपयांची तरतूद २०१७-१८ च्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
राज्य सरकारच्या ५० टक्के वाट्याचे १५० कोटी रूपये राज्यातील तीन रेल्वे प्रकल्पांना देण्याचे अर्थसंकल्पात वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देण्याचे जाहीर केले आहे. त्यात वडसा-गडचिरोली या रेल्वे मार्गाचा समावेश आहे. त्यामुळे या रेल्वे मार्गाच्या कामाला गती आली आहे. जमीन अधिग्रहणाचे काम जुलै २०१७ पर्यंत पूर्णत्वास न्यावे, असे निर्देश मागील आठवड्यात रेल्वे मंत्री सुरेश प्रभू व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये झालेल्या मुंबई येथील बैठकीत देण्यात आले होते. त्यामुळे वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गाच्या भूसंपादन कामाला गती आली आहे. रेल्वे प्रकल्पात आरमोरी तालुक्यातील रवी, अरसोडा, आरमोरी, पालोरा, शेगाव, ठाणेगाव, वासाळा, इंजेवारी, देऊळगाव, किटाली, चुरमुरा, आकापूर चक या गावांमधील जमीन जाणार आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Only private land will be required for the railway route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.