पुनर्नियोजनासाठी मिळाला केवळ दोन कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 01:18 AM2018-11-17T01:18:26+5:302018-11-17T01:19:03+5:30

जिल्हा परिषदेच्या पुनर्नियोजित अर्थसंकल्पासाठी अपुरा निधी उपलब्ध असल्यामुळे सर्वच विभागांसाठी निधीची तरतूद करताना अर्थ व नियोजन समितीला काटकसर करावी लागली. शुक्रवारी झालेल्या अर्थसंकल्पीय सभेत या नियोजनाला सभागृहाने मंजुरी दिली.

Only two crore funds for re-planning | पुनर्नियोजनासाठी मिळाला केवळ दोन कोटींचा निधी

पुनर्नियोजनासाठी मिळाला केवळ दोन कोटींचा निधी

Next
ठळक मुद्देसभागृहाची मंजुरी : अपुऱ्या जिल्हा निधीमुळे नियोजनात काटकसर

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या पुनर्नियोजित अर्थसंकल्पासाठी अपुरा निधी उपलब्ध असल्यामुळे सर्वच विभागांसाठी निधीची तरतूद करताना अर्थ व नियोजन समितीला काटकसर करावी लागली. शुक्रवारी झालेल्या अर्थसंकल्पीय सभेत या नियोजनाला सभागृहाने मंजुरी दिली. मात्र त्यानंतर झालेल्या सर्वसाधारण सभेत काँग्रेस सदस्यांनी काही मुद्द्यांवर असमाधान व्यक्त करीत सभात्याग केला.
पुनर्नियोजनासाठी सुमारे २ कोटीचा निधी उपलब्ध झाला. दुपारी १२ ते १ यादरम्यान झालेल्या अर्थसंकल्पीय सभेत त्या निधीचे जिल्हा परिषदेच्या १७ विभागांसाठी नियोजन करण्यात आले. जि.प.सदस्य जगन्नाथ बोरकुटे यांनी या बजेटच्या तरतुदीला विरोध दर्शविला. मात्र उर्वरित सदस्यांनी बजेट मंजूर केला. त्यानंतर लगेच झालेल्या सर्वसाधारण सभेत कृषी विभागासाठी योग्य तरतुद केली नसल्याचे सांगत काँग्रेस सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र मर्यादित निधी असतानाही २५ लाखांची तरतूद केली असल्याचे पदाधिकाºयांनी सांगितले.
आरेवाडातील बांधकामाच्या चौकशीची मागणीही उपस्थित झाली. परंतू दहन-दफनभूमीचा निधी पालकमंत्र्यांच्या शिफारसीनुसार थेट ग्रामपंचायतींकडे हस्तांतरित होत असल्याने त्यात जिल्हा परिषदेचा संबंध नसल्याचे पदाधिकाºयांनी सांगितले.
सभेला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष योगिता भांडेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, उपाध्यक्ष अजय कंकडालवार, बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम, कृषी सभापती नाना नाकाडे, महिला व बालकल्याण सभापती जनसुधा जनगाम आदींसह सर्व विभाग प्रमुख आणि सदस्य उपस्थित होते.
काँग्रेस सदस्यांचा सभात्याग
काँग्रेस पक्षाच्या सदस्यांच्या जि.प.क्षेत्रातील कामे आधी मंजूर करून नंतर बदलविले जातात, असाही आरोप करीत आणि कृषी समितीकडून शेतकरीपूरक योजनांसाठी योग्य तरतूद होत नसल्याचे सांगत काँग्रेस व सहयोगी सदस्यांनी जि.प.सदस्य अ‍ॅड. राम मेश्राम यांच्या नेतृत्वात सर्वसाधारण सभेतून बहिर्गमन केले.

Web Title: Only two crore funds for re-planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.