कोरची तालुक्यातील ग्रामीण भागातील रुग्णांना शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत उपचार कोरची ग्रामीण रुग्णालयात दिला जाणार आहे.
या शिबिरामध्ये दंतरोग चिकित्सा उपचार डोळ्याची तपासणी व मोतीबिंदूचे ऑपरेशन, स्त्रीरोग तपासणी व उपचार कॅन्सर, मधुमेह, उच्चरक्तदाब व पक्षघात व इतर आजारांचे निदान व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनात दिला जाणार असल्याची माहिती कोरची ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ.बागराज धुर्वे यांनी दिली आहे.
या शिबिरामध्ये नोंदणीसाठी ग्रामीण रुग्णालय कोरची, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र,आरोग्य कर्मचारी यांच्याशी संपर्क साधण्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रुडे, जिल्हा आरोग्य डाॅ.शशिकांत शंभरकर गडचिरोली, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद मडावी यांनी तालुक्यातील नागरिकांना आवाहन केले आहे..