लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : एकेकाळी गावात संपर्काचे अत्यंत महत्त्वाचे साधन असलेल्या लॅन्डलाईला (दूरध्वनी) मोबाईलमुळे उतरती कळा लागली असून लॅन्डलाईन आता केवळ शासकीय कार्यालयापुरत्याच सिमित राहिल्या आहेत. जिल्हाभरात सुमारे १७ हजार २४८ दूरध्वनीसेवा पुरविण्याची क्षमता आहे. मात्र केवळ आता ४ हजार ४४३ दूरध्वनी कनेक्शन शिल्लक राहिले आहेत.मोबाईलचा शोध लागण्यापूर्वी लॅन्डलाईन हेच संपर्काचे महत्त्व साधन होते. त्यामुळे शहराबरोबरच गावखेड्यातही दूरध्वनी संच खरेदी केला जात होता. गावातील काही निवडक नागरिकांकडे दूरध्वनी सेवा राहत होती. त्या दूरध्वनीवर गावातील अर्ध्या नागरिकांच्या नातेवाईकांचे फोन येत होते. दूरध्वनीचे महत्त्व लक्षात घेऊन बहुतांश व्यक्तींनी दूरध्वनी जोडणी घेतली होती. मात्र १० वर्षांपूर्वी मोबाईलचा शोध लागला. मोबाईलचा विस्तार प्रत्येक गावापर्यंत व घरापर्यंत झाला. बीएसएनएलसह खासगी कंपन्यांनी ग्रामीण भागात टॉवर उभारून सेवा उपलब्ध करून दिली.दूरध्वनीच्या तुलनेत मोबाईलचा वापर करणे सहज शक्य होते. मोबाईल हे उपकरण खिशामध्ये राहत असल्याने संबंधित व्यक्तीला कधीही संपर्क साधता येते. मोबाईल सेवा देण्यात अनेक खासगी कंपन्या उतरल्या. त्यामुळे त्यांच्यामध्ये स्पर्धा निर्माण होऊन अत्यंत कमी दरात मोबाईल सेवा उपलब्ध होत आहे. परिणामी नागरिकांनी दूरध्वनी सेवेकडे दुर्लक्ष केले आहे. ज्यांच्याकडे दूरध्वनीसेवा होती, त्यांनी सुद्धा आता ही सेवा बंद केली आहे.शासकीय कार्यालयांमध्ये तसेच ज्या व्यक्ती वा संस्थेला ब्रॉडबँडची गरज आहे, अशा व्यक्तीला व संस्थेला लॅन्डलाईनचा क्रमांक, केबल घेणे आवश्यक असल्याने संबंधित कार्यालयात दूरध्वनीसेवा आढळून येते. घरामधून मात्र दूरध्वनी संच जवळपास गायबच झाला असल्याचे दिसून येते.बीएसएनएलने केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यात १७ हजार २४८ कनेक्शन घेऊ शकतात, एवढी क्षमता आहे. मात्र त्यापैकी केवळ ४ हजार २४३ कनेक्शन आहेत. त्याचबरोबर ३ हजार १८६ ब्रॉन्डबँड सर्व्हिस कनेक्शनची क्षमता आहे. मात्र केवळ २ हजार २४२ नागरिकांकडे ब्रॉडबँड सर्व्हिस आहे.ओएफसीमुळे ब्रॉडबँडही धोक्यातदिवसेंदिवस इंटरनेटचा वापर वाढत चालला आहे. दूरसंचार सेवेतील ओएफसी केबल हा नवीन शोध आहे. आॅप्टिकल फायबर केबलमुळे (ओएफसी) इंटरनेटची स्पिड १५ ते २० पट अधिक राहते. त्यामुळे शासकीय कार्यालये, संस्था ओएफसी केबलला अधिक पसंती देत आहेत. यासाठी बीएसएनएलने कंत्राटदार नेमून सेवा देण्यास सुरुवात केली आहे. ज्या कार्यालयामध्ये इंटरनेचा वापर अधिक आहे, अशा कार्यालयांमध्ये ब्रॉडबँडची जागा आता ओएफसी केबल घेत आहे. ओएफसी केबलबरोबरच नवीन दूरध्वनी क्रमांक दिला जात आहे. त्यामुळे पीनकोड असलेले जुने दूरध्वनी क्रमांक व ब्रॉडबँडसुद्धा धोक्यात आले आहे.
शासकीय कार्यालयातच उरले लॅन्डलाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 11:28 PM
एकेकाळी गावात संपर्काचे अत्यंत महत्त्वाचे साधन असलेल्या लॅन्डलाईला (दूरध्वनी) मोबाईलमुळे उतरती कळा लागली असून लॅन्डलाईन आता केवळ शासकीय कार्यालयापुरत्याच सिमित राहिल्या आहेत.
ठळक मुद्देमोबाईलचा परिणाम : केवळ ४ हजार २४८ जोडण्या शिल्लक