१२ हजार वर वाहनचालकांनी काढले पक्के परवाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2017 12:42 AM2017-04-30T00:42:00+5:302017-04-30T00:42:00+5:30

गडचिरोली जिल्ह्यात प्रत्येक वर्षी १५ हजार वर नव्या दुचाकी व चारचाकी वाहनाची भर पडत आहे.

Pacca licenses removed by drivers for 12 thousand | १२ हजार वर वाहनचालकांनी काढले पक्के परवाने

१२ हजार वर वाहनचालकांनी काढले पक्के परवाने

googlenewsNext

वर्षभरात : १५ हजार २८९ शिकाऊ वाहन परवाने; आरटीओ कार्यालयाला मिळाला लाखोंचा महसूल
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात प्रत्येक वर्षी १५ हजार वर नव्या दुचाकी व चारचाकी वाहनाची भर पडत आहे. त्यामुळे शिकाऊ व कायमस्वरूपी परवाना काढणाऱ्या वाहनचालकाची संख्या वाढली आहे. सन २०१६-१७ या वर्षभरात सर्व प्रकारच्या वाहनांचे चालक मिळून एकूण १२ हजार ९७५ जणांनी पक्के परवाने काढले. तर १५ हजार २८९ जणांनी शिकाऊ वाहन परवाने काढले.
वाहनांची गरज वाढली असल्याने नवे वाहन खरेदी करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. आरटीओ व पोलीस विभागाच्या कारवाईमुळे वाहन परवाना काढणाऱ्याचे प्रमाण वाढले आहे. या परवानाच्या माध्यमातूनही गडचिरोलीच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला शुल्काच्या माध्यमातून दरवर्षी लाखो रूपयांचे उत्पन्न मिळत असते. सन २०१६-१७ या वर्षात १ एप्रिल ते ३१ मार्च २०१७ या कालावधीत ३ हजार ९०७ जणांनी नॉन ट्रान्सपोर्ट कारच्या वाहनाचे परवाने काढले. ५९४ ट्रॅक्टरधारकांनी तर ७ हजार २४१ मोटार सायकलस्वारांनी पक्के परवाने काढले. ट्रान्सपोर्ट व्हेईकल असलेल्या २५४ जणांनी वर्षभरात पक्के परवाने काढले. पक्के व शिकाऊ परवाना काढणाऱ्यांमध्ये मोटार सायकलस्वारांचा अधिक समावेश आहे. परवाना काढण्यासाठी गडचिरोलीच्या आरटीओ कार्यालयात नेहमी लोकांची गर्दी असते. याशिवाय तालुकास्तरावर होत असलेल्या परवाना शिबिरातही दुर्गम भागातील वाहनचालक परवाना काढण्यासाठी गर्दी करीत असतात. (प्रतिनिधी)

वाहन परवानाधारक वाढले
पूर्वी दुचाकी वाहनांची संख्या गडचिरोली जिल्ह्यात कमी होती. मात्र आता दोन ते तीन वर्षांपासून नव्या दुचाकी वाहनांची भर पडत आहे. महाविद्यालयीन युवक, युवती परवाना काढत असल्याने गडचिरोली जिल्ह्यात परवानाधारकांची संख्या वाढली आहे.

Web Title: Pacca licenses removed by drivers for 12 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.