अर्धवट तुटलेला वीज खांब धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 11:21 PM2018-03-19T23:21:11+5:302018-03-19T23:21:11+5:30
तालुक्यातील सायगाव येथे अर्धवट तुटलेल्या स्थितीत वीज खांब उभा आहे. या ठिकाणचा वीज खांब बदलवून नवीन वीज खांब लावण्यात यावा, अशी मागणी सायगाव येथील अनिल प्रधान व इतर नागरिकांनी महावितरणकडे केली होती.
आॅनलाईन लोकमत
आरमोरी : तालुक्यातील सायगाव येथे अर्धवट तुटलेल्या स्थितीत वीज खांब उभा आहे. या ठिकाणचा वीज खांब बदलवून नवीन वीज खांब लावण्यात यावा, अशी मागणी सायगाव येथील अनिल प्रधान व इतर नागरिकांनी महावितरणकडे केली होती. मात्र महावितरणने याकडे दुर्लक्ष केले. अर्धवट तुटलेल्या सिमेंटच्या वीज खांबामुळे दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सायगाव येथील अनिल प्रधान यांच्या घराजवळ सिमेंटचा विजेचा खांब आहे. डिसेंबर २०१७ पासून सदर खांब अर्धवट तुटलेल्या स्थितीत आहे. सदर खांबाला विद्युत ताराची जोडणी करण्यात आली आहे. या सिमेंट खांबाला मध्यभागातून मोठी भेग गेल्यामुळे हा खांब के व्हाही कोसळे शकते. त्यामुळे जीवितहानी अथवा मोठी दुर्घटना होण्याची शक्यता बळावली आहे. सदर खांब तत्काळ हटवून त्या ठिकाणी दुसरे नवीन वीज खांब लावण्यात यावे, अशी मागणी अनिल प्रधान यांच्यासह वॉर्डातील नागरिकांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र महावितरणच्या अधिकारी व कर्मचाºयांनी सदर वीज खांबांचा पंचनामाही केला नाही.
बराच कालावधी उलटूनही वीज खांब बदलविण्यात आले नाही. त्यामुळे लोकांच्या जीविताला हानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र या गंभीर बाबीकडे महावितरणच्या अधिकाºयांचे कायमचे दुर्लक्ष आहे. आरमोरी तालुक्यातील वडधा व इतर गावांमध्ये अनेक जुने लोखंडी व सिमेंट काँक्रिटच्या वीज खांबांची अशीच परिस्थिती आहे. अनेक ठिकाणच्या डीपी खुल्या आहेत. महावितरणने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.