साेमवारच्या धरणे आंदाेलनात माेठ्या संख्येने सहभागी व्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:34 AM2021-02-14T04:34:10+5:302021-02-14T04:34:10+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : विदर्भ राज्य आंदाेलन समितीच्या वतीने महावितरणकडून सुरू असलेल्या वीज कपातीच्या कारवाईविराेधात १५ फेब्रुवारी राेजी ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : विदर्भ राज्य आंदाेलन समितीच्या वतीने महावितरणकडून सुरू असलेल्या वीज कपातीच्या कारवाईविराेधात १५ फेब्रुवारी राेजी साेमवारला येथील इंदिरा गांधी चाैकात धरणे आंदाेलन करण्यात येणार आहे. या आंदाेलनात विदर्भवादी कार्यकर्ते व सर्व नागरिकांनी माेठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समितीचे मुख्य निमंत्रक राम नेवले यांनी केले. येथील शिवाजी महाविद्यालयात विदर्भवादी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली.
या बैठकीत ते बाेलत हाेते. विदर्भ राज्य आंदाेलन समिती मागील दाेन वर्षांपासून सातत्याने विजेच्या प्रश्नावर आंदाेलन करीत आहे. सत्ताधाऱ्यांनी दिलेलेे आश्वासन फाेल ठरले आहे. आता बिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याचा सपाटा वीज कंपनीने सुरू केला आहे. या कारवाईचा निषेध करण्यासाठी धरणे आंदाेेलन हाेणार आहे.
बैठकीला समितीचे जिल्हा समन्वयक अरुण मुनघाटे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र ठाकूर, अशाेक पाेरेड्डीवार, उपाध्यक्ष रमेश उप्पलवार, याेगेंद्र नांदगाये, शालिक नाकाडे, जगदीश बेदरे, जिल्हा महासचिव गाेवर्धन चव्हाण, परशुराम सातार, कृष्णा नेताम, सुनील आभारे आदी उपस्थित हाेते.
बाॅक्स....
या आहेत मागण्या
काेराेना काळातील वीज बिल सरकारने भरावे, २०० युनिटपर्यंत वीज माेफत द्यावी व त्यानंतर बिल निम्मे करावे, शेतकऱ्यांना शेती पंपाच्या वीज बिलातून मुक्त करावे, शेती पम्पाचे लाेडशेडिंग बंद करावे, गाेरेेवाडा येथील आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयास स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याऐवजी ‘गाेंडवाना प्राणिसंग्रहालस’ असे ना द्यावे आदी मागण्यांकडे विदर्भवादी कार्यकर्तेे धरणे आंदाेलनातून शासनाचे लक्ष वेधून घेणार आहेत.