मार्र्कं ड्यात उसळला जनसागर

By admin | Published: July 28, 2014 11:32 PM2014-07-28T23:32:15+5:302014-07-28T23:32:15+5:30

श्रावण महिन्याला २७ जुलैपासून प्रारंभ झाला असून विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्र मार्कंडादेव येथे शनिवारी पवित्र श्रावण मास पर्वकाळाची महापूजनाने सुरूवात करण्यात आली.

People in the middle of the road | मार्र्कं ड्यात उसळला जनसागर

मार्र्कं ड्यात उसळला जनसागर

Next

चामोर्शी : श्रावण महिन्याला २७ जुलैपासून प्रारंभ झाला असून विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्र मार्कंडादेव येथे शनिवारी पवित्र श्रावण मास पर्वकाळाची महापूजनाने सुरूवात करण्यात आली. भगवान महामुनी मार्र्कंडेश्वराच्या मुख्य मंदिरात महामृत्यूंजय मार्र्कंडेश्वरास सहस्त्र बिल्वार्चनाने अभिषेक व धार्मिक विधी सकाळी ६.३० ते ८.३० वाजेपर्यंत करण्यात आला. गडचिरोलीसह इतर जिल्ह्यातील शिवभक्तांचा जनसागर मंदिरात दर्शनासाठी उसळला होता.
सोमवारी सकाळी श्रावण मास महाअभिषेक बिल्वार्चन महापूजा जि. प. चे कृषी व पशुसंवर्धन सभापती अतुल गण्यारपवार, पंकज पांडे, शुभांगी पांडे, अशोक गावडे, अश्विनी गावडे यांच्या हस्ते करण्यात आली. संपूर्ण श्रावण महिनाभर मनोज हेजीब, उज्ज्वला हेबीज हे सपत्नीक पूजा करणार आहेत. सकाळी ६.३० वाजतापासून मार्कंडा येथे जिल्ह्यासह इतर भागातील भाविकांनी भगवान शंकर व महामुनी मार्र्कंडेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. त्यामुळे मार्कंडा देवस्थानातील वातावरण नादमय झाले होते. श्रावण मासात दररोज पहाटेपासूनच मंदिरात पूजाअर्चा केली जाणार आहे. त्यामुळे दररोज भाविकांचा महासागर उसळण्याची शक्यता आहे. यासाठी मंदिर समिती ट्रस्टच्यावतीने खास व्यवस्था भाविकांसाठी करण्यात आली आहे.
देवस्थान परिसरात दुर्गंधी पसरू नये, यासाठी मंदिर समितीच्यावतीने लक्ष ठेवल्या जात आहे. त्यामुळे श्रावण मासभर मार्र्कंडा येथील वातावरण भक्तिमय राहणार आहे. मंदिरात महाअभिषेक पूजा लोमेश महाराज जंदालवार, रामु महाराज गायकवाड, आनंदराव महाराज जंदालवार यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी मार्र्कंडादेवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गजानन भांडेकर, माजी खा. मारोतराव कोवासे, उपाध्यक्ष मनोज पालारपवार, सचिव मृत्यूंजय गायकवाड, सहसचिव रामुजी तिवाडे, कोषाध्यक्ष पा. गो. पाडे, विश्वस्त हरीभाऊ खिनखिनकर, व्यवस्थापक जनार्धन जुनघरे, उज्वल गायकवाड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. श्रावण पर्वकाळात भगवान शिवशंकराचे दर्शन घेण्यासाठी भक्त मोठ्या संख्येने मार्र्कंडा देवस्थानाकडे दाखल होत आहेत. हर हर महादेव या घोषणेसह भाविकांचे जत्थे मार्र्कंडात भगवान शंकराच्या दर्शनासाठी दाखल होत आहेत. त्यामुळे मार्र्कंडात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी बंदोबस्तही करण्यात आला आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: People in the middle of the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.