गडचिराेली : थंड पाणी विक्रीच्या व्यवसायाला उन्हाळ्यात सुगीचे दिवस असतात. मात्र गतवर्षीपासून आतापर्यंत काेराेना संसर्गाच्या महामारीमुळे इतर व्यवसायांसाेबतच आरओ वाॅटरच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. विशेष म्हणजे या वर्षी थंड पाण्याचा हा व्यवसाय १० टक्क्यांच्या आतच आहे.
काेराेना महामारीमुळे यंदा विवाह समारंभ, वाढदिवस, बारसे आदी काैटुंबिक तसेच सार्वजनिक कार्यक्रम पूर्णत: बंद आहेत. कार्यक्रम हाेत असले तरी माेजक्या लाेकांच्या उपस्थितीत अत्यंत साध्या पद्धतीने ते पार पाडले जात आहेत. त्यामुळे अशा कार्यक्रमात थंड पाण्याच्या कॅनची मागणी हाेत नसल्याचे व्यावसायिकांनी सांगितले आहे. दरवर्षी उन्हाळ्यात हाेणारे माेठे कार्यक्रम पूर्णत: बंद असल्याने थंड पाण्याच्या कॅनची मागणी प्रचंड घटली असून, काेराेनामुळे ८० ते ९० टक्के व्यवसाय बुडाला आहे.
बाॅक्स...
पालिकेकडे २६ प्रकल्पांची नाेंद
गडचिराेली नगरपालिकेच्या हद्दीत जवळपास २५ आरओ वाॅटर प्लॅन्ट आहेत. पालिकेकडे या २६ आरओ वाॅटर प्लॅन्टची नाेंद आहे. गडचिराेली शहरात मुख्य बाजारपेठेसह कॅम्प एरिया, गाेकुलनगर, हनुमान वाॅर्ड, सर्वाेदय वाॅर्ड, रामनगर, काॅम्प्लेक्स, गांधी वाॅर्ड व इतर भागात आरओ वाॅटर प्लॅन्ट आहेत. मध्यंतरीच्या काळात पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी नाेव्हेंबर महिन्यात शहरातील आरओ प्लॅन्ट व्यावसायिकांना नाेटीस बजावली हाेती. तेव्हा काही दिवस व्यवसाय पूर्णत: बंद हाेता.
बाॅक्स...
सकाळी हाेताे पुरवठा
शहरात मागणी केलेल्या ग्राहकांना आरओ वाॅटर प्लान्टधारक चारचाकी वाहनाद्वारे थंड पाण्याचे कॅन सकाळच्या सुमारास ११ वाजेपर्यंत पाेहाेचवित आहेत.
काेट....
काेराेनाची पहिली लाट मार्च महिन्यापासून सुरू झाली. मागील वर्षीचा संपूर्ण उन्हाळा काेराेना संकटातच गेला. आता काेराेनाची दुसरी लाट सुरू असून संसर्ग अधिकच वाढत आहे. काेराेनामुळे गेल्या वर्षी व या वर्षीसुद्धा आरओ वाॅटरचा व्यवसाय बुडाला आहे. या वर्षी गरजू माेजक्या ग्राहकांनाच पाण्याचे कॅन पाेहाेचविले जात आहेत.
- मिलिंद जुआरे, व्यावसायिक, आरमाेरी
काेट..
उन्हाळ्यात थंड पाण्याची गरज अधिक भासते. आम्ही दरवर्षी उन्हाळ्यात चार ते पाच महिने दरराेज पाण्याचे एक ते दाेन कॅन मागवत असताे. मात्र यंदा काेराेना संसर्गाच्या भीतीमुळे घरचे नळाचेच पाणी पीत आहाेत. पूर्वीसारखे आता काेराेनाकाळात थंड पाण्याचे कॅनही सहजासहजी घरपाेच मिळत नाहीत. त्यामुळे माठातील थंडगार पाण्याचा वापर पिण्यासाठी केला जात आहे.
- समीर रायपुरे, ग्राहक
काेट...
आमच्या दुकानात ग्राहक व इतर सर्वांसाठी थंड पाण्याचे कॅन उन्हाळ्यात येत हाेते. आता काेराेना महामारीच्या संकटात लाॅकडाऊनमुळे दुकान बंद असल्याने पाण्याचे कॅन बंद करण्यात आले आहेत. काेराेना संसर्गाबाबत आम्ही सर्व कुटुंबीय काळजी घेत असून, घरी मागविण्यात येणारे पाण्याचे कॅनही बंद केले आहेत. घरच्या फिल्टरमधील पाणीच वापरले जात आहे.
- सुभाष चुनारकर, ग्राहक