चामोर्शीच्या बालउद्यान चौकाजवळ पोलीस सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:37 AM2021-04-16T04:37:21+5:302021-04-16T04:37:21+5:30
वाढत्या कोरोना संसर्गामुळे राज्यासह जिल्ह्यात राज्य सरकारने लागू केलेल्या संचारबंदी काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व ...
वाढत्या कोरोना संसर्गामुळे राज्यासह जिल्ह्यात राज्य सरकारने लागू केलेल्या संचारबंदी काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व संचारबंदीची अंमलबजावणी व्हावी यासाठी चामोर्शी पोलीस प्रशासन सतर्क आहे. शहरात दिवसभर बँक, ‘अत्यावश्यक सेवा’ मेडिकल आदी कामांसाठी नागरिक बाहेर येत असतात. बाजारपेठ बंद असून अनावश्यक नागरिक वाहनाने व पायी रस्त्याने फिरतानाही दिसून येत आहे. त्याला लगाम घालण्यासाठी पोलीस लक्ष ठेवून आहेत. मुल, घोट, गडचिरोली मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांची कसून चौकशी करून दंडही आकारला जात आहे . बालउद्यान चौकातील चारही रस्त्यांवर चौकशी करून दंड वसूल करण्यात येत आहे. यावेळी उपविभागीय अधिकारी उत्तम तोडसाम, तहसीलदार जितेंद्र शिकतोडे, पोलीस निरीक्षक बिपीन शेवाळे, महसूल, नगरपंचायत व पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. संचारबंदीत कडक निर्बंध लावत राज्यात १४४ कलम लागू करण्यात आले आहेत त्या पार्श्वभूमीवर तालुक्यात नियमाचे अटी, शर्तींचे काटेकोर पालन करण्यासाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.