वाढत्या कोरोना संसर्गामुळे राज्यासह जिल्ह्यात राज्य सरकारने लागू केलेल्या संचारबंदी काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व संचारबंदीची अंमलबजावणी व्हावी यासाठी चामोर्शी पोलीस प्रशासन सतर्क आहे. शहरात दिवसभर बँक, ‘अत्यावश्यक सेवा’ मेडिकल आदी कामांसाठी नागरिक बाहेर येत असतात. बाजारपेठ बंद असून अनावश्यक नागरिक वाहनाने व पायी रस्त्याने फिरतानाही दिसून येत आहे. त्याला लगाम घालण्यासाठी पोलीस लक्ष ठेवून आहेत. मुल, घोट, गडचिरोली मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांची कसून चौकशी करून दंडही आकारला जात आहे . बालउद्यान चौकातील चारही रस्त्यांवर चौकशी करून दंड वसूल करण्यात येत आहे. यावेळी उपविभागीय अधिकारी उत्तम तोडसाम, तहसीलदार जितेंद्र शिकतोडे, पोलीस निरीक्षक बिपीन शेवाळे, महसूल, नगरपंचायत व पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. संचारबंदीत कडक निर्बंध लावत राज्यात १४४ कलम लागू करण्यात आले आहेत त्या पार्श्वभूमीवर तालुक्यात नियमाचे अटी, शर्तींचे काटेकोर पालन करण्यासाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
चामोर्शीच्या बालउद्यान चौकाजवळ पोलीस सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 4:37 AM