पॅरावैद्यक व्यावसायिकांना काेविड लसीकरणात प्राधान्य द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:34 AM2021-02-14T04:34:19+5:302021-02-14T04:34:19+5:30
गडचिराेली : अतिदुर्गम आदिवासीबहुल नक्षलग्रस्त गडचिराेली जिल्ह्यातील खासगी नाेंदणीकृत पॅरावैद्यक व्यावसायिकांना काेविड लसीकरणात प्राधान्याने प्राथमिकता द्यावी, अशी मागणी ...
गडचिराेली : अतिदुर्गम आदिवासीबहुल नक्षलग्रस्त गडचिराेली जिल्ह्यातील खासगी नाेंदणीकृत पॅरावैद्यक व्यावसायिकांना काेविड लसीकरणात प्राधान्याने प्राथमिकता द्यावी, अशी मागणी एमएलटीएएम संघटना गडचिराेलीच्या वतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आराेग्य अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, पॅरावैद्यक परिषद नाेंदणीकृत पॅरावैद्यक व्यावसायिक व्यक्ती तसेच प्रयाेगशाळा तंत्रज्ञ हे आपल्या क्लिनिकल प्रयाेगशाळेच्या माध्यमातून काेविड संसर्ग झालेल्या रुग्णांच्या सर्व प्रकारच्या रक्त व इतर परीक्षण करून वैद्यकीय व्यावसायिकांना त्यांचे एनालेसिस रिपाेर्ट देत असतात. काेराेना काळात पॅरावैद्यक व्यावसायिकांनी याेद्धे म्हणून काम केले आहे. अशा व्यावसायिकांना काेराेना लसीकरणात प्राधान्य द्यावे असे म्हटले आहे.
निवेदनावर संघटनेचे सचिव विष्णू वैरागडे यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. काेविड लस देण्यासंदर्भात महाराष्ट्र पॅरावैद्यक परिषद मुंबईच्या प्रबंधकांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र आले आहे.