प्राथमिक शिक्षक देणार एक दिवसाचे वेतन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:28 AM2021-04-29T04:28:26+5:302021-04-29T04:28:26+5:30
गडचिराेली : काेराेना महामारीचा सामना करण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रसामुग्री व इतर बाबी खरेदी करण्यासाठी जिल्हाभरातील प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक, ...
गडचिराेली : काेराेना महामारीचा सामना करण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रसामुग्री व इतर बाबी खरेदी करण्यासाठी जिल्हाभरातील प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक, उच्चश्रेणी मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख एक दिवसाचे वेतन जिल्हा विकास निधीत जमा करणार आहेत. याबाबतचे निवेदन प्राथमिक शिक्षक जिल्हा समन्वय समितीच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे.
जिल्ह्यात काेराेनाची साथ भयंकर स्वरूप धारण करीत आहे. काेराेना रुग्णांना आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने शिक्षक एक दिवसांचे वेतन जिल्हा विकास निधीत जमा करणार आहेत. या निधीतून काय खरेदी करायचे, याचा निर्णय जिल्हाधिकारी घेतील. जिल्हाभरात जवळपास ४ हजार ५०० शिक्षक आहेत. या सर्वांचे एक दिवसाचे वेतन जवळपास एक काेटी रुपये हाेते. एवढी रक्कम जमा केली जाणार आहे.
संकटाच्या काळात शिक्षक संघटनेने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत हाेत आहे. इतरही कर्मचारी संघटनांनी यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.
हा निर्णय घेण्यासाठी समन्वय समितीचे अनिल मुलकलवार, रघुनाथ भांडेकर, लालचंद धाबेकर, प्रमाेद खांडेकर, चक्रपाणी कन्नाके, धनपाल मिसार, किशाेर कुरवटकर, विजय बन्साेड, गुरुदेव नवघडे, देवेंद्र लांजेवार, बापू मुनघाटे यांनी पुढाकार घेतला.