भारतीय स्वातंत्र्याच्या ७४व्या वर्धापन दिनानिमित्त गडचिरोली येथे त्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी ते मार्गदर्शन करीत हाेते. यावेळी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार, आमदार डॉ. देवराव होळी, जिल्हाधिकारी दीपक सिंगला, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, प्रकल्प अधिकारी आशिष येरेकर, निवासी उपजिल्हाधिकारी जी. एम. तळपाडे उपस्थित होते.
नक्षलवाद्यांचा मुकाबला करताना शहीद झालेल्या जवानांना राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी श्रद्धांजली अर्पण केली. गडचिरोली जिल्हा महाराष्ट्र राज्यातील अभिमानाचे स्थान असलेला जिल्हा आहे. जिल्ह्यातील भाषा, भौगोलिक परिसर, निसर्ग जणू एक मिनी भारतच असल्याचे ते यावेळी म्हणाले. सध्या कोरोना संसर्गामुळे जगासह संपूर्ण भारत देशात विविध बंधने आहेत. गडचिरोली जिल्ह्यातही सर्व
आरोग्य कर्मचारी, पोलीस व प्रशासनातील लोकांनी मेहनत करून संसर्गाला रोखण्यासाठी योगदान दिले आहे. जनतेने केलेल्या सहकार्यामुळे आज कोरोनाला रोखण्यात चांगले यश मिळत आहे, असे मार्गदर्शन केले.
बाॅक्स
पाेलीस दलाचे काैतुक
जिल्ह्यात नक्षलवाद कमी होत आहे. आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. यावेळी त्यांनी पोलीस विभागाला मिळालेल्या पदकाबद्दल माहिती देताना पुढे सांगितले की, पोलीस दलात कार्यरत असताना नेमणुकीच्या ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना स्वातंत्र्य दिनानिमित्त शासनाकडून सन्मानित केले जाते. यावर्षी सुद्धा गडचिरोली पोलीस दलातील २१ अधिकारी व अंमलदारांना राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक व १ अधिकारी यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले. निश्चितच गडचिरोली पोलीस दलासाठी ही अभिमानास्पद कामगिरी असल्याचे यड्रावकर म्हणाले.
बाॅक्स
उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्थांचा सत्कार
महाआवास अभियान ग्रामीणअंतर्गत जिल्हास्तरीय पुरस्काराअंतर्गत जिल्हास्तरावरील उत्कृष्ट तालुका यामध्ये कोरचीचा प्रथम क्रमांक आला असून, पंचायत समिती सभापती श्रवणकुमार मातलाम यांनी पुरस्कार स्वीकारला. जिल्हास्तरावरील उत्कृष्ट ग्रामपंचायत यामध्ये आरमोरी येथील देलनवाडीने प्रथम. जिल्हास्तरावरील उत्कृष्ट ग्रामीण गृहनिर्माण अभियंता ता. आरमोरी राकेश चलाख. जिल्हास्तरीय युवा पुरस्कार संस्थेमध्ये संस्कार संस्था, एटापल्ली ता. एटापल्ली, जि. गडचिरोली. जिल्हास्तरीय युवा पुरस्कार (युवक) यामध्ये अनुप वसंत कोहळे यांना तर सार्वजनिक बांधकाम विभाग, गडचिरोली येथील प्रशांत ढोंगे सहाय्यक कार्यकारी अभियंता
यांना कोविडकाळात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल. आधारविश्व फाउंडेशन, गडचिरोली येथील गीता हिंगे (अध्यक्ष), ॲड. कविता मोहरकर (सदस्य), दिलशाद पिरानी (सदस्य) यांना कोविड काळात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल
सत्कार करण्यात आला. महात्मा ज्योतिराव फुले व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांमध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रुडे यांचा सत्कार करण्यात आला. तालुका कृषी अधिकारी आनंद मुरलीधर पाल यांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. संचालन ओमप्रकाश संग्रामे व नितेश झाडे, तर आभार उपजिल्हाधिकारी जी. एम. तळपाडे यांनी मानले.
४४ हजार ६०८ कामगारांना मदत
जिल्ह्यातील ४४ हजार ६०८ कामगारांना १ कोटी ८७ लाख रुपयांची मदत त्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात आली आहे.