वीज सुविधांसाठी अतिरिक्त निधी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2019 06:00 AM2019-12-01T06:00:00+5:302019-12-01T06:00:29+5:30
गडचिरोली जिल्ह्याचा बहुतांश भाग जंगलाने व्यापला आहे. जंगलातून विद्युत पुरवठा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच खर्चही अधिक येते. अजुनही काही गावांमध्ये वीज पुरवठा झाला नाही. जंगलातून विद्युत लाईन गेली असल्याने वेळोवेळी वीज पुरवठा खंडीत होतो. ज्या गावांना वीज पुरवठा झाला नाही, .......
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याला विशेष बाब म्हणून वीज सुविधा पुरविण्यासाठी अतिरिक्त निधी देण्यात यावा, अशी मागणी खासदार अशोक नेते यांनी केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंग यांच्याकडे केली आहे. निवेदन दिल्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील वीज समस्यांबाबत चर्चाही केली.
गडचिरोली जिल्ह्याचा बहुतांश भाग जंगलाने व्यापला आहे. जंगलातून विद्युत पुरवठा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच खर्चही अधिक येते. अजुनही काही गावांमध्ये वीज पुरवठा झाला नाही. जंगलातून विद्युत लाईन गेली असल्याने वेळोवेळी वीज पुरवठा खंडीत होतो. ज्या गावांना वीज पुरवठा झाला नाही, अशा गावांना वीज पुरवठा करण्यासाठी निधी देण्यात यावा, तसेच ज्या गावांना भविष्यात वीज पुरवठा करणे शक्य नाही, अशा गावांना सौरऊर्जेवर चालणारी उपकरणे उपलब्ध करून द्यावी, यासाठी वाढीव निधीची तरतूद करावी. गडचिरोली जिल्हा आकांक्षित अंतर्गत येत असल्याने या जिल्ह्यासाठी अतिरिक्त निधी मंजूर करावा, अशी मागणी खासदार अशोक नेते यांनी केली आहे.