पाेलीसपाटलांच्या सेवानिवृत्तीचे वय ६५ करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:41 AM2021-09-12T04:41:42+5:302021-09-12T04:41:42+5:30

गाव कामगार पाेलीसपाटील संघाच्या पदाधिकाऱ्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची मुंबई येथील शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी आ. माेहन ...

Raise the retirement age of Paelispatals to 65 | पाेलीसपाटलांच्या सेवानिवृत्तीचे वय ६५ करा

पाेलीसपाटलांच्या सेवानिवृत्तीचे वय ६५ करा

Next

गाव कामगार पाेलीसपाटील संघाच्या पदाधिकाऱ्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची मुंबई येथील शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी आ. माेहन चंद्रिकापुरे, पाेलीसपाटील संघाचे राज्य कार्याध्यक्ष भुजंगराव परशुरामकर, औरंगाबाद विभागाचे अध्यक्ष जब्बार पठाण, गडचिराेली जिल्हाध्यक्ष शरद ब्राह्मणवाडे, सचिव मुरारी दहिकर, लुकडाेजी डाेंगरवार, ब्रह्मपुरी शाखा उपाध्यक्ष किशाेर तिडके, नरेंद्र बनपुरकर आदी उपस्थित हाेते.

सेवानिवृत्त पाेलीसपाटलांना सेवानिवृत्ती याेजना लागू करावी, काेराेनामुळे मृत्यू झालेल्या पाेलीसपाटलांना ५० लाखांचा विमा मंजूर करावा, ग्राम पाेलीस अधिनियम १९६७ मध्ये दुरुस्ती करावी, पदाचे नूतनीकरण बंद करावे, विभागीय चाैकशी पूर्ण झाल्याशिवाय पाेलीसपाटलांवर कारवाई करू नये आदी मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली.

पाेलीसपाटलांच्या मागण्यांविषयी आपण सकारात्मक असून लवकरच याेग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन गृहमंत्र्यांनी दिले.

Web Title: Raise the retirement age of Paelispatals to 65

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.