लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : पंचायत समितीने बांधकाम केलेल्या दुकानाच्या गाळ्यांमध्ये काही नागरिकांनी अतिक्रमण केले. ही बाब पंचायत समितीला माहित होताच पंचायत समितीने पोलिसांची मदत घेत सोमवारी अतिक्रमण हटविले. त्यामुळे जवळपास दोन तास तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.पंचायत समितीच्या समोरच्या भागात कसनसूर मार्गालगत काही दुकानदारांनी अतिक्रमण करून दुकाने सुरू केली होती.२५ नोव्हेंबर २०१८ रोजी पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी किशोर गज्जलवार यांनी या जागेवरील अतिक्रमण हटवून तत्काळ ५० गाळ्यांचे बांधकाम सुरू केले. यातील अनेक गाळ्यांचे बांधकाम ९० टक्के पूर्ण झाले आहे. अतिक्रमणधारक किशोर मंडल विरूध्द सभापती प्रकरणात अहेरी न्यायालयाने अतिक्रमणधारकांच्या बाजुने निकाल दिला असून अतिक्रमण हटवू नये, असे आदेश पारीत केले असल्याचे सांगून बांधलेल्या गाळ्यांमध्ये दोन दिवसांपूर्वी अतिक्रमण केले. ही बाब बीडीओ गजलवार यांना माहित झाल्यानंतर त्यांनी पोलिसांना पाचारण करून दुकान गाळ्यांमधील अतिक्रमण हटविले. यामुळे तब्बल दोन तास चांगलेच तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र चोख पोलीस बंदोबस्तामुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही.याबाबत बीडीओ गजलवार यांना विचारणा केली असता, न्यायालयाचे आदेश आपापल्याला अजूनपर्यंत प्राप्त झाले नाही. काही जण दिशाभूल करून प्रकरण चिघडविण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी प्रतिक्रिया दिली. तर अतिक्रमण काढण्याचा अधिकार बीडीओ यांना नाही, अशी प्रतिक्रिया सुरेश बारसागडे यांनी दिली आहे.
पं.स.च्या गाळ्यातील अतिक्रमण हटविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 11:22 PM
पंचायत समितीने बांधकाम केलेल्या दुकानाच्या गाळ्यांमध्ये काही नागरिकांनी अतिक्रमण केले. ही बाब पंचायत समितीला माहित होताच पंचायत समितीने पोलिसांची मदत घेत सोमवारी अतिक्रमण हटविले. त्यामुळे जवळपास दोन तास तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
ठळक मुद्देदोन तास तणाव : चोख पोलीस बंदोबस्तात कारवाई