देसाईगंजमध्ये संचारबंदीला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:37 AM2021-04-16T04:37:17+5:302021-04-16T04:37:17+5:30

देसाईगंज हे शहर गोंदिया, भंडारा व चंद्रपूर या जिल्ह्याच्या केंद्रस्थानी असून, नावाजलेली व्यापारी बाजारपेठ आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ...

Response to curfew in Desaiganj | देसाईगंजमध्ये संचारबंदीला प्रतिसाद

देसाईगंजमध्ये संचारबंदीला प्रतिसाद

Next

देसाईगंज हे शहर गोंदिया, भंडारा व चंद्रपूर या जिल्ह्याच्या केंद्रस्थानी असून, नावाजलेली व्यापारी बाजारपेठ आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर व्यापारी तसेच ग्राहक खरेदी-विक्रीसाठी या ठिकाणी येतात. कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने उग्ररूप धारण केल्याने ‘ब्रेक द चेन’अंतर्गत पर्याय नसल्याने शासनास १५ दिवसाची संचारबंदी करावी लागली.

नेहमी गोंगाट, गजबजाट असणाऱ्या शहरात आवश्यक सेवा देणारी मोजकी दुकाने उघडलेली हाेती. मास्क घालून व शारीरिक अंतर ठेवून ग्राहक वस्तू खरेदी करीत होते. पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त करण्यात आल्याने विनाकारण व मनोरंजनासाठी फिरणारे पाहिजे तेवढे दिसून आले नाही. ब्रह्मपुरी तालुक्यातील काही माेजकेच नागरिक देसाईगंज येथे आले हाेते. दिवसभर रस्ते व बाजारपेठेत शुकशुकाट दिसून येताे.

Web Title: Response to curfew in Desaiganj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.