लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्थानिक नगर पालिकेच्या वतीने वैशिष्ट्यपूर्ण विशेष निधी (ठोक तरतूद अंतर्गत) शहरातील वर्दळीच्या रस्त्याचे तब्बल आठ कामे मंजूर करण्यात आली असून या कामांची सर्व प्रशासकीय कार्यवाही पूर्ण झाली आहे. निविदा प्रक्रियाही आटोपली असून कंत्राटदारही निश्चित झाले आहेत. मात्र आता पावसाळा सुरूवात होणार असल्याने ही कामे सध्या होणार नाहीत. पावसाळ्यानंतरच संबंधित कंत्राटदार या रस्त्यांची कामे हाती घेणार आहेत.नगर परिषदेच्या वतीने वैशिष्ट्यपूर्ण विशेष निधीतून भूमिगत नाली व रस्त्यांची आठ कामे सन २०१७-१८ च्या प्राप्त निधीतून घेण्यात आली आहे. सदर कामांची प्रशासकीय व तांत्रिक मान्यता मिळविण्यासाठीची प्रक्रिया बरीच लांबली. त्यामुळे ही कामे दीड ते दोन वर्षापासून थंडबस्त्यात पडली होती. त्यानंतर पालिका प्रशासनाने हालचाली वाढवून या कामांची प्रशासकीय कार्यवाही पूर्ण केली. तब्बल १५ कोटी रुपयातून होणारी रस्त्यांची ही आठ कामे मोठ्या स्वरूपाची असल्याने सदर कामे सार्वजनिक बांधकाम विभाग गडचिरोलीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. साबांविने निविदा प्रक्रिया पूर्ण करून सदर कामे लवकर आटोपण्याच्या तयारीत आहे. मात्र येत्या काही दिवसात मान्सून धडकणार असून पावसाळ्यात सीसी रोड व डांबरी रस्त्याची कामे करणे शक्य होत नाही. त्यामुळे कंत्राटदारांकडून पावसाळ्यानंतर दीपावलीदरम्यान या कामाचा शुभारंभ होण्याची शक्यता आहे.१५ कोटीतून होणाऱ्या या आठ कामांमध्ये काबरा यांच्या दुकानापासून हनुमान मंदिर ते श्री गॅस एजन्सी समोरून मुख्य चंद्रपूर रोडपर्यंत सीसी रोड व ड्रेनचे बांधकाम, हनुमान मंदिर ते ढिवर मोहल्ला ते बेसिक शाळा ते वंजारी मोहल्ला ते दिलीप सारडा ते देवानी किराणा ते चंद्रपूर मेन रोडपर्यंत, लांझेडा न.प. शाळा ते खरपुंडी रोड जागोबा नैताम यांच्या घरापर्यंत बंदिस्त नाली, सीसी रोड, धानोरा मेन रोड-इंदिरानगर नगर परिषद शाळा-दातार यांच्या घरापर्यंत सीसी रोड व नाली बांधकाम, धानोरा रोडपासून-शिवाजी कॉलेज ते रेड्डी गोडाऊनपर्यंत सीसी रोड व नाली बांधकाम, पोटेगाव बायपास रोड-मडावी ते रेड्डी गोडाऊन ते पोटेगाव रोडपर्यंत सीसी रोड व नाली बांधकाम, चंद्रपूर रोड ते तलाव ते आरसीडब्ल्यूपर्यंत सीसी रोड व ड्रेनचे बांधकाम आणि चनकाई नगर ते गोकुलनगर ते पाण्याची टाकी ते चामोर्शी रोडपर्यंत रूंदीकरण व डांबरीकरण आदी कामांचा समावेश आहे. चनकाई नगर ते गोकुलनगर हा मार्ग वगळला तर इतर सात कामे सिमेंट काँक्रीटची आहे.चामोर्शी मार्गावरून रेड्डी गोडाऊन ते पोटेगावकडे जाणाºया मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. विशेष म्हणजे, सदर मार्ग हा सखल भागात येत असल्याने पावसाळ्यात या मार्गावर नेहमी पाणी साचून असते. नव्याने सीसी रोडचे काम हाती घेतले तरी सदर रोड अधिक वर्ष टिकण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे या सीसी रोडचे बांधकाम करताना पाण्याचा निचरा होण्याच्या उद्देशाने या मार्गावर मध्येमध्ये मोठे पाईप टाकणे आवश्यक आहे.यंदाही चिखलातून होणार मार्गक्रमणगतवर्षी व त्यावर्षीच्या पावसाळ्याच्या दिवसात चामोर्शी मार्गावरून रेड्डी गोडाऊन ते पोटेगाव रस्त्यावर जोडणाºया मार्गावर चिखलाचे साम्राज्य असते. पालिकेच्या वतीने सदर मार्गावर तात्पुरती व्यवस्था म्हणून मुरूम टाकल्या जातो. मात्र हा मुरूम पावसाच्या प्रवाहाने अल्पावधीतच वाहून जातो. तसेच मुरूमामुळे चिखलाचे साम्राज्य अधिक वाढते. गतवर्षीच्या पावसाळ्यात या मार्गाने आवागमन करणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. या मार्गाचे काम मंजूर झाले असले तरी ते हाती घेण्यात न आल्याने यंदा पावसाळ्यातील तीन महिने नागरिक व वाहनधारकांना चिखलातूनच वाट काढावी लागणार आहे.
पावसाळ्यानंतरच होणार रस्त्यांची कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 10:25 PM
स्थानिक नगर पालिकेच्या वतीने वैशिष्ट्यपूर्ण विशेष निधी (ठोक तरतूद अंतर्गत) शहरातील वर्दळीच्या रस्त्याचे तब्बल आठ कामे मंजूर करण्यात आली असून या कामांची सर्व प्रशासकीय कार्यवाही पूर्ण झाली आहे. निविदा प्रक्रियाही आटोपली असून कंत्राटदारही निश्चित झाले आहेत.
ठळक मुद्देगडचिरोली शहरातील कामे : १५ कोटीतून सात सीसी व एका डांबरी मार्गाची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण