बसेसच्या छताला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 11:19 PM2019-08-04T23:19:07+5:302019-08-04T23:19:28+5:30

शहरी भागासह ग्रामीण भागाच्या कानाकोपऱ्यात प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेली बससेवा भंगार अवस्थेमुळे प्रवाशांसाठी डोकेदुखीची ठरत आहे. अहेरी बस आगारातील अनेक बसेस भंगार झाल्याने पाऊस सुरू असताना त्या गळतात. याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागतो. नागरिकांना सिटवर छत्री घेऊन बसावे लागते.

The roof of the buses leaked | बसेसच्या छताला गळती

बसेसच्या छताला गळती

Next
ठळक मुद्देअहेरी आगाराचे दुर्लक्ष : प्रवाशांना छत्री उघडून बसावे लागते आसनांवर

लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : शहरी भागासह ग्रामीण भागाच्या कानाकोपऱ्यात प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेली बससेवा भंगार अवस्थेमुळे प्रवाशांसाठी डोकेदुखीची ठरत आहे. अहेरी बस आगारातील अनेक बसेस भंगार झाल्याने पाऊस सुरू असताना त्या गळतात. याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागतो. नागरिकांना सिटवर छत्री घेऊन बसावे लागते.
अहेरी उपविभागात जोरदार पाऊस सुरू आहे. परंतु दररोज कर्तव्यावर अथवा कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांना बसमधून प्रवास करावा लागतो. सध्या अहेरी आगाराच्या अनेक बसेसची दुरवस्था झाली आहे. परंतु या बसेसची दुरूस्ती करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागतो. अनेक बसेसच्या छतातून पाणी गळत असल्याने प्रवाशांना एकतर उभे राहावे लागते किंवा बसमध्ये छत्री उघडी करून बसावे लागते. प्रवासी बसमधून प्रवास करीत असतांना आवश्यक प्रवासभाडे देऊनही त्यांना योग्य सोयी मिळत नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

कपडे व साहित्य भिजतात
एटापल्ली, सिरोंचा व भामरागड सारख्या दुर्गम भागात सोडण्यात येणाºया बसेसच्या छतातून पाणी गळते. पाणी आसनांवर पडून ती ओली होतात. तसेच शालेय विद्यार्थ्यांचे गणवेश, पुस्तके भिजतात. पावसाळा सुरू होण्यापूर्वी आगाराने बसच्या छतांची दुरूस्ती करणे आवश्यक होते. परंतु दुर्लक्षच झाले.

Web Title: The roof of the buses leaked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.