सगुणा धान लागवडीचे प्रात्यक्षिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 11:58 PM2019-07-11T23:58:06+5:302019-07-11T23:58:52+5:30
चामोर्शी येथील केवळराम हरडे कृषी महाविद्यालयाच्या चतुर्थ वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत भेंडाळा येथील शेतकऱ्यांना सगुणा पद्धीने धान लागवडीचे प्रात्यक्षिक करून दाखविले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भेंडाळा : चामोर्शी येथील केवळराम हरडे कृषी महाविद्यालयाच्या चतुर्थ वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत भेंडाळा येथील शेतकऱ्यांना सगुणा पद्धीने धान लागवडीचे प्रात्यक्षिक करून दाखविले.
प्रात्यक्षिकासाठी १० बाय ३५ फुटाचा वाफा तयार केला. या वाफ्यावर स्टँडद्वारे छिद्र पाडले. प्रत्येक छिद्रात दोन ते तीन बिजे टाकली. त्यांना मातीच्या हलक्या थराने बुजविण्यात आले. सहा ते सात दिवसांत लहान-लहान रोपे तयार झाले. सगुणा पद्धतीच्या धान लागवडीमुळे अतिशय कमी बियाणे लागतात. तसेच इतर खर्चही वाचण्यास मदत होते, असे मार्गदर्शन केले. प्रात्यक्षिकाच्या वेळी भेंडाळा येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृषी शिवार संघाचे अंकूर सारवे, नवल राठोड, विशाल ठलाल या विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले.