काेराेनाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन राज्य शासनाने १५ एप्रिलपासून राज्यभरात संचारबंदी लागू केली आहे. अत्यावश्यक कारणासाठीच एसटीने प्रवास करण्याची परवानी देण्यात आली आहे. दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करताना ई-पास आवश्यक करण्यात आले आहे. तसेच एसटीत बसतेवेळी ई-पास किंवा संबंधित कार्यालयाचे ओळखपत्र दाखविल्याशिवाय परवानगी दिली जात नाही. त्यामुळे दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करण्यावर बरीच बंधने घालण्यात आली आहेत. त्यामुळे अत्यावश्यक कारण असल्याशिवाय नागरिक दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करीत नसल्याचे दिसून आले. जिल्हांतर्गत प्रवासासाठी मात्र काेणतेही बंधन नाहीत. नेमक्या काेणत्या कारणांसाठी ते गडचिराेली येथे आले हाेते किंवा इतर गावाला गेले हाेते याबाबत लाेकमतने बसस्थानकावरील प्रवाशांना विचारणा केली असता, अगदी क्षुल्लक कारणांसाठी नागरिक एसटीने प्रवास करीत असल्याचे दिसून आले आहे.
बाॅक्स
प्रवाशांनी प्रवासाची सांगितलेली कारणे थक्क करणारी
-संचारबंदीमुळे घरीच राहावे लागत आहे. घरी बसून राहण्यापेक्षा नातेवाईकांकडे चार दिवस राहता येते. कामाच्या वेळेवर चार दिवस नातेवाईकाकडे थांबणे अशक्य हाेते. आता काम नाही त्यामुळे फिरून यायचे आहे.
- जवळच्या नातेवाईकाकडे लग्न असल्याने जावे लागत आहे. काेराेनाची भीती आहे मात्र काय करणार, लग्नाला जावेच लागते.
- गावचा दुकानदार अधिक किमतीने किमतीने किराणा विकतात. किराणा व भाजीपाला खरेदीसाठी गडचिराेली येथे आलाे हाेताे.
- माझे कुटुंब नागपूरला राहते. मी नाेकरी गडचिराेली जिल्ह्यात करताे. शासकीय कार्यालयांमध्ये १५ टक्के उपस्थिती केली आहे. आजपर्यंत कर्तव्यावर हाेताे. आज नागपूरला जात आहे.
बाॅक्स
पास किंवा कार्ड दाखविल्याशिवाय प्रवास नाही
गडचिराेली आगारातून दुसऱ्या जिल्ह्यातील नागपूर, चंद्रपूर व ब्रह्मपुरी याच ठिकाणी बस साेडल्या जात आहेत. या प्रवाशांकडे ई-पास किंवा अत्यावश्यक सेवेबाबतचे प्रमाणपत्र असल्याशिवाय बसमध्ये बसू दिले जात नाही.
बाॅक्स
सहाच मार्गांवर बस सुरू
संचारबंदीमुळे प्रवाशांची संख्या घटली आहे. काही माेजकेच प्रवासी प्रवास करीत आहेत. रिकामे वाहन चालविण्यात काहीच अर्थ नसल्याने एसटी विभागाकडून काही माेजक्याच मार्गांवर बसेस साेडल्या जात आहेत. मुरूमगाव, कुरखेडा, चंद्रपूर, नागपूर, आष्टी, ब्रह्मपुरी याच मार्गावर एक ते दाेन फेऱ्या साेडल्या जात आहेत.