सिरोंचा तालुक्यात तीस ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली. परंतु आरडा ग्रामपंचायतमध्ये सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक गणपूर्तीअभावी झाली नाही. ९ सदस्यीय ग्रामपंचायतमध्ये पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी करण्यासाठी दाेन तृतीयांश सदस्य म्हणजेच ६ सदस्य आवश्यक हाेते. परंतु आरडा ग्रामपंचायतमध्ये केवळ पाच सदस्य हजर होते. ग्रा.पं. निवडणुकीत ९ सदस्यांपैकी दोन जागांवर नामांकन अर्जाअभावी जागा रिक्त होत्या. एका महिलेने तीन जागांवर नामांकन अर्ज भरले होते. त्यापैकी दोन जागांवर अविरोध निवड झाली होती व एका जागेवर निवडणूक लढवून जिंकली. त्यामुळे तीन जागा एकाच महिलेकडे होत्या. त्यातील दोन जागा सोडाव्या लागल्याने चार जागा रिक्त झाल्या. त्यामुळे आरडा ग्रामपंचायत मध्ये दाेन तृतीयांशप्रमाणे सहा सदस्य संख्या आवश्यक होती. गणपूर्ती न झाल्याने पदाधिकाऱ्यांची निवड झाली नाही.
उमेदवाराअभावी चिंतरेवलात सरपंच पद रिक्त
चिंतरेवला ग्रामपंचायतमध्ये सरपंच पद अनुसूचित जमाती महिलासाठी राखीव होते परंतु त्या ग्रामपंचायतीत अनुसूचित जमाती महिला राखीव जागा रिक्त असल्याने सरपंच पदासाठी नामांकन अर्ज भरता आले नाही. केवळ उपसरपंच पद भरण्यात आले. उपसरपंचपदी जोडे तिरुपतया व्यंकटी हे विराजमान झाले
मद्दिकुंठा ग्रामपंचायतमध्ये सरपंच पद रिक्त
सिरोंचा तालुक्यातील मद्दिकुंठा ग्रामपंचायतचे सरपंच पद अनुसूचित जमाती महिलासाठी आरक्षण होते.या ग्रामपंचायतमध्ये पात्र उमेदवार असूनही नामांकन अर्ज दाखल न केल्याने सरपंच पद रिक्त आहे. उपसरपंचपदी रिक्कुला सुजाता क्रिष्णमूर्ती हि महिला अविरोध निवडून आली आहे.