‘मेक इन गडचिरोली’च्या माध्यमातून राेजगार मिळाल्याचे समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:34 AM2021-02-14T04:34:06+5:302021-02-14T04:34:06+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क चामोर्शी : मेक इन गडचिराेलीच्या माध्यमातून अनेक ठिकाणी अगरबत्ती प्रकल्प निर्माण करण्यात आले असून, या प्रकल्पाच्या ...

Satisfaction of getting employment through ‘Make in Gadchiroli’ | ‘मेक इन गडचिरोली’च्या माध्यमातून राेजगार मिळाल्याचे समाधान

‘मेक इन गडचिरोली’च्या माध्यमातून राेजगार मिळाल्याचे समाधान

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क

चामोर्शी : मेक इन गडचिराेलीच्या माध्यमातून अनेक ठिकाणी अगरबत्ती प्रकल्प निर्माण करण्यात आले असून, या प्रकल्पाच्या माध्यमातून शेकडाे बेराेजगार महिलांना राेजगार मिळाल्याचे समाधान आहे, असे प्रतिपादन आ. डाॅ. देवराव हाेळी यांनी केले.

मेक इन गडचिराेलीच्या माध्यमातून दि. १२ फेब्रुवारी राेजी शुक्रवारला चामाेर्शी येथे अगरबत्ती प्रकल्पाचा शुभारंभ आमदार डाॅ. देवराव हाेळी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बाेलत हाेते. जिल्ह्यातील शेकडो परिवारांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे दिलेले वचन पूर्णत्वास येत असून, शुक्रवारी येथील एकत्रित ७० अगरबत्ती मशीनयुक्त अगरबत्ती प्रकल्पाच्या माध्यमातून येथेच अगरबत्तीचा सुगंधित मसाला तयार करण्यात येणार आहे व एकाच जागी काम करून शेकडो महिलांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे, असे आमदार डाॅ. हाेळी यांनी सांगितले.

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जि. प. चे कृषी सभापती रमेश बारसागडे, भाजप तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी चंद्रशेखर कोहळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, एसीबीचे उपअधीक्षक सुरेंद्र गरड, आत्माचे प्रकल्प संचालक संदीप कऱ्हाळे, अग्रणी बँकेचे एलडीएम टेंभूर्णे, बँक ऑफ महाराष्ट्राचे व्यवस्थापक अभयसिंग चौधरी, पाेलीस निरीक्षक नागनाथ पाटील, जिल्हा उद्योग केंद्राचे अतुल पवार, आरटीसीचे संचालक चेतन वैद्य, हेमंत मेश्राम, जयराम चलाख, आशिष पिपरे, साेनाली पिपरे, चंद्रशेखर मस्के, ओमदास झरकर आदी उपस्थित हाेते.

Web Title: Satisfaction of getting employment through ‘Make in Gadchiroli’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.