जिल्ह्यातील बचत गटांना बाजारपेठ मिळवूण देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 05:00 AM2021-09-25T05:00:00+5:302021-09-25T05:00:44+5:30

आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांनी गोगाव येथील फुलोरा क्षमता विकसन बालभवन प्रकल्प असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेला भेट दिली. या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानासह स्थानिक साहित्यामधून मुलांना शिक्षण दिले जाते, त्याची माहिती त्यांनी जाणून घेतली. कोरोनामुळे विद्यार्थी शाळेत नव्हते. मात्र, शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेले विविध उपक्रम त्यांनी आयुक्तांना सादर केले.

Saving groups in the district will be allowed to get market | जिल्ह्यातील बचत गटांना बाजारपेठ मिळवूण देणार

जिल्ह्यातील बचत गटांना बाजारपेठ मिळवूण देणार

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : नागपूर महसूल विभागाच्या विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांनी शुक्रवारी कुरखेडा तालुक्यातील रामगड येथे महिला बचत गटाद्वारे चालविल्या जाणाऱ्या सीताफळ आणि जांभूळ प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली व महिलांशी संवाद साधला. या प्रकल्पात बनविल्या जाणाऱ्या विविध पदार्थांना नागपूरसारख्या शहरात बाजारपेठ मिळवून दिल्यास महिलांच्या आर्थिक उन्नतीला हातभार लागेल, असा मनोदय करून त्यांनी तसा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी संजय मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, उपविभागीय अधिकारी समाधान शेंडगे, जीवनोन्नती अभियानाच्या चेतना लाटकर उपस्थित होत्या. महिला बचत गटाद्वारे तयार केलेल्या उत्पादनाला नामांकित कंपनीसोबत जोडून पदार्थांचे विक्री केंद्र सुरू करता येईल का, याबाबतही माहिती घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

विविध पदार्थांचा घेतला आस्वाद
यावेळी आयुक्तांनी महिला बचत गटाद्वारे तयार केलेल्या विविध पदार्थांचा आस्वादही घेतला. बचत गटाने जांभूळ पल्प, सीताफळ, अंबाडी, मोहाचे लाडू, मध, आदी विविध पदार्थ व फळ प्रकियेची माहिती दिली. बचत गटाच्या सीताफळ व जांभूळ प्रकल्पाचे त्यांनी विशेष कौतुक करून भविष्यात इतर ठिकाणीही महिला बचत गटाद्वारे असे विविध उपक्रम पाहावयास मिळतील, अशी आशा व्यक्त केली.

महिलांच्या हिमतीने भारावल्या आयुक्त
महिनाभरात दुसऱ्यांदा गडचिरोली जिल्ह्याच्या भेटीवर आलेल्या विभागीय आयुक्तांनी रामगड संगिनी ग्रामसंघाद्वारे चालविल्या जाणाऱ्या या प्रकल्पाची माहिती जाणून घेतली. पदार्थ निर्मिती, पॅकेजिंग, विक्री व फायदे तोटे समजून घेतले. गडचिरोली सारख्या दुर्गम भागातील महिला अतिशय चांगल्या प्रकारे काम करून कुटुंबाला आर्थिक पाठबळ देत आहेत. स्वत:च्या पायावर उभ्या राहून त्यांनी सर्वांसमोर एक प्रकारचा आदर्शच निर्माण केला आहे, अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

गोगाव येथील जिल्हा परिषद शाळेला भेट
- आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांनी गोगाव येथील फुलोरा क्षमता विकसन बालभवन प्रकल्प असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेला भेट दिली. या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानासह स्थानिक साहित्यामधून मुलांना शिक्षण दिले जाते, त्याची माहिती त्यांनी जाणून घेतली. कोरोनामुळे विद्यार्थी शाळेत नव्हते. मात्र, शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेले विविध उपक्रम त्यांनी आयुक्तांना सादर केले. मुलांसाठी हसतखेळत मनोरंजनातून वेगवेगळ्या टूल्सचा वापर करून चांगले शिक्षण देण्याचे कार्य या शाळेतून होत असल्याची कौतुकपर भावना त्यांनी व्यक्त केली.

- यावेळी डायटचे प्राचार्य शरदचंद्र पाटील, वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. विनीत मत्ते, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) हेमलता परसा उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रेरणेतून फुलोरा क्षमता विकसित प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पाची पार्श्वभूमी, सादरीकरण, साहित्य निर्मिती व इतर माहिती भेटीदरम्यान देण्यात आली. शाळेतील  व्हर्च्युयल क्लासरूमलासुद्धा मान्यवरांनी भेट दिली. शाळेतील शिक्षिका सुरेखा हलामी, शालू मेटे व वनश्री जाधव यांनी यावेळी सादरीकरण केले. याप्रसंगी गट शिक्षणाधिकारी यु. एन. राऊत, केंद्रप्रमुख बंडू खोबरागडे, शाळेच्या मुख्याध्यापिका उज्ज्वला खोबरागडे, शिक्षक वृंद, विषय सहायक डॉ. विजय रामटेके, कुणाल कोवे व विठ्ठल होंडे उपस्थित होते. तांत्रिक सहकार्य विषय सहायक तपण सरकार यांनी केले.

 

Web Title: Saving groups in the district will be allowed to get market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.