साठवून ठेवलेला ४९ पेट्या गुळ केला जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 12:23 AM2020-06-20T00:23:25+5:302020-06-20T00:24:05+5:30
अहेरी, सिरोंचा व मुलचेरा तालुक्यात गुळाची दारू मोठ्या प्रमाणात काढल्या जाते. अनेक अनेक जण यासाठी गुळाची अनधिकृतपणे साठवणूक करून दारू गाळणाऱ्यांना त्याची विक्री करतात. अशाच प्रकारे आलापल्ली येथील नामदेव पैका रेड्डी याने गुळाची साठवणूक करून ठेवल्याची माहिती मुक्तिपथ तालुका चमूला शुक्रवारी सकाळी मिळाली. त्यांनी अहेरी पोलिसांना याची माहिती देत सदर इसमाच्या घरी धाड टाकली असता ४९ पेट्या गूळ साठवून ठेवल्याचे आढळून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : अनधिकृतपणे साठवून ठेवलेला ४९ पेट्या गूळ अहेरी पोलिसांनी शुक्रवारी आलापल्ली येथून जप्त केला. या गुळाची किंमत ३९ हजार रूपये आहे. याप्रकरणी नामदेव पैका रेड्डी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गूळ दारू गाळणाऱ्यांना विक्री केला जाणार होता, अशी माहिती आहे.
अहेरी, सिरोंचा व मुलचेरा तालुक्यात गुळाची दारू मोठ्या प्रमाणात काढल्या जाते. अनेक अनेक जण यासाठी गुळाची अनधिकृतपणे साठवणूक करून दारू गाळणाऱ्यांना त्याची विक्री करतात. अशाच प्रकारे आलापल्ली येथील नामदेव पैका रेड्डी याने गुळाची साठवणूक करून ठेवल्याची माहिती मुक्तिपथ तालुका चमूला शुक्रवारी सकाळी मिळाली. त्यांनी अहेरी पोलिसांना याची माहिती देत सदर इसमाच्या घरी धाड टाकली असता ४९ पेट्या गूळ साठवून ठेवल्याचे आढळून आले. गूळ ताब्यात घेत पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. सदर कारवाई सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब शिंदे, पोलीस उपनिरीक्षक विनायक दडस व कर्मचाऱ्यांनी केली. यासाठी मुक्तिपथ तालुका संघटक केशव चव्हाण आणि प्रेरक मारोती चल्लावार यांनी सहकार्य केले. महिनाभराच्या कालावधीत पोलिसांनी चार ते पाच ठिकाणी कारवाई करून गुळ जप्त केला आहे. यावरून गुळाचा वापर दारू काढण्यासाठी वाढला असल्याचे दिसून येते.
दारूसह मोहफूल सडवा नष्ट
कोरची शहरातील वॉर्ड क्र. ७ मध्ये गुरुवारी रात्री पोलीस व मुक्तिपथ संघटनेच्या वतीने धाड टाकून २५ लिटर मोहफूल दारूसह ४५ किलो मोहफूल सडवा नष्ट करून जप्त करण्यात आला. दुखिया नैताम ही महिला दारू गाळून विक्री करीत असल्याची माहिती मुक्तिपथ संघटनेला मिळाली. त्यानंतर रात्री तिच्या घराची झडती घेतली असता, सदर मुद्देमाल आढळून आला. या कारवाईसाठी तालुका संघटक नीळा किन्नाके यांनी पोलिसांना सहकार्य केले.