सात हजार कृषिपंपधारक शेतकरी झाले कर्जमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:37 AM2021-04-07T04:37:27+5:302021-04-07T04:37:27+5:30
शेतकऱ्यांनी थकीत वीजबिल भरावे, यासाठी शासनाने वीजबिल सवलत याेजना सुरू केली. या अंतर्गत वीजबिल भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या वीजबिलांवरील व्याज माफ ...
शेतकऱ्यांनी थकीत वीजबिल भरावे, यासाठी शासनाने वीजबिल सवलत याेजना सुरू केली. या अंतर्गत वीजबिल भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या वीजबिलांवरील व्याज माफ करण्यात आले. तसेच इतरही सवलती लागू केल्या हाेत्या. याचा लाभ घेत गडचिराेली विभागातील ४ हजार ८५७ शेतकऱ्यांनी ३ काेटी ३२ लाख, आलापल्ली विभागातील २ हजार ४०५ शेतकऱ्यांनी २ काेटी ९६ लाख रुपयांच्या वीजबिलांचा भरणा केला आहे.
बाॅक्स...
वीजबिलाची ६६ टक्के रक्कम हाेणार विकासावर खर्च
गडचिराेली जिल्ह्यातील कृषिपंपधारक शेतकऱ्यांनी ६ काेटी २८ लाख रुपयांचा भरणा केला. त्यातील ३३ टक्के रक्कम म्हणजे २ काेटी ७ लाख रुपये हे कृषी ग्राहकांच्या संबंधित गावाच्या मूलभूत सुविधांवर खर्च केले जाणार आहेत. तर उर्वरित ३३ टक्के रक्कम गडचिराेली जिल्ह्यातील मूलभूत सुविधांसाठी उपलब्ध हाेणार आहेत.