गडचिरोली जिल्ह्यात दुर्गम भाग, चांगल्या रस्त्यांची अडचण आणि नक्षली कारवायांमुळे ही योजना राबविताना पोलीस विभागाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागू शकते; पण तरीही पोलीस विभाग ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी तयारीला लागला आहे. नक्षली प्रादुर्भाव नसणाऱ्या देसाईगंज ते चामोर्शी तालुक्यापर्यंतच्या पट्ट्यात या योजनेचा चांगला लाभ नागरिकांना मिळू शकेल.
(बॉक्स)
कॉल येताच कळणार लोकेशन
११२ नंबरवर एखाद्याने मोबाइल किंवा कोणत्याही संपर्क माध्यमातून फोन केल्यास तो कॉल मुंबई किंवा नागपूर येथे असणाऱ्या दोन राज्यस्तरीय कंट्रोल रूममध्ये जाईल. कॉल कुठून आला, त्याचे ठिकाणही तेथील यंत्रणेला लगेच कळू शकेल. त्यानंतर तो कॉल लगेच संबंधित जिल्ह्याच्या या कामासाठी बनविलेल्या विशेष कंट्रोल रूममध्ये जाईल. तेथून तक्रारीच्या स्वरूपानुसार विशेष वाहनाने पोलीस पथक संबंधित व्यक्तीच्या मदतीसाठी पोहोचू शकेल.
मदतीसाठी डायल करावा लागेल ११२
- आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत हवी असल्यास ११२ नंबर डायल करायचा आहे. शहरी भागात १० मिनिटातच पोलीस मदतीला धावून येतील.
- जिल्हा पोलीस दलात त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. जिल्हा मुख्यालयी असणाऱ्या कंट्रोल रूममधून त्याचे सूत्रसंचालन होईल.
५४ चारचाकी, १०० दुचाकी...
या विशेष सुविधेसाठी जिल्ह्यात ५४ चारचाकी वाहने आणि १०० दुचाकी वाहनांची गरज भासणार आहे. ही वाहने जीपीएस यंत्रणेसह विविध सुविधांनी सुसज्ज राहतील. त्यावर कार्यरत कर्मचाऱ्यांकडे संपर्क व लोकेशन शोधण्यासाठी तसेच कंट्रोल रूमकडून येणारे संदेश पाहण्याासाठी टॅबलेट राहील. सध्या फक्त १३ बोलेरो वाहने उपलब्ध झाली आहेत.
कोरोनामुळे अडले प्रशिक्षण
११२ हेल्पलाइनसाठी ३०० पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार. सध्या कोरोनामुळे हे प्रशिक्षण अडले असून, ऑनलाइन प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न होऊ शकतो, असे वायरलेस विभागाचे पोलीस निरीक्षक के.आर.बाराभाई यांनी सांगितले.
कोट
ही हेल्पलाइन कार्यान्वित करण्यासाठी सेटअप लावणे सुरू आहे. याची अंमलबजावणी कुठपर्यंत आणि कशा पद्धतीने करता येईल, हे तपासले जाईल, पण सध्या संपूर्ण जिल्हा या सेवेत कव्हर होईल, या दृष्टिने तांत्रिक तयारी केली जात आहे.
- अंकित गोयल
पोलीस अधीक्षक, गडचिरोली.