दिवाळी संपताच काेेराेेना रुग्ण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 05:00 AM2020-11-20T05:00:00+5:302020-11-20T05:00:23+5:30
दिवाळीच्या कालावधीत बाजारपेठेत उसळलेली गर्दी बघून दिवाळीनंतर काेराेना रुग्णांची संख्या वाढेल, असा अंदाज आराेग्य विभागाने व्यक्त केला हाेता. हा अंदाज खरा ठरत दिवाळी संपताच आता काेराेना रुग्णांच्या संख्येत वाढ हाेत असल्याचे दिसून येत आहे. दिवाळीच्या सणापूर्वीच काही जणांना काेराेनाची लागण झाली हाेती. मात्र दवाखान्यात राहिल्यास दिवाळीचा आनंद लुटता येणार नाही. ही बाब लक्षात घेऊन अनेकांनी चाचणी केली नाही.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : दिवाळीच्या काही दिवसांपूर्वीपासून नवीन काेराेना बाधितांची संख्या कमी हाेत हाेती तर काेराेनामुक्त झालेल्यांची संख्या वाढत हाेती. मात्र दिवाळी संपताच आता गणित उलटे झाले असून काेराेना बाधितांची संख्या वाढत आहे. तर काेराेनामुक्त हाेण्याचे प्रमाण कमी आहे. ही स्थिती कायम राहिल्यास काेराेनाचे संकट पुन्हा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. गुरूवारी ५१ काेराेनामुक्त झाले तर ८० नवीन बाधित आढळून आले. गडचिराेलीतील सर्वाेदय वाॅर्डातील एका ७६ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला.
जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ७ हजार १२९ झाली आहे. ६ हजार ५६१ जणांनी काेराेनावर मात केली आहे. ४९४ जणांवर उपचार सुरू आहेत. काेराेनामुळे एकूण ७४ जणांचा मृत्यू झाला आहे. काेराेना रुग्ण बरे हाेण्याचे प्रमाण ९२.०३ टक्के, क्रियाशील रुग्णांचे प्रमाण ६.९३ टक्के तर मृत्यू दर १.०४ टक्के आहे.
नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील स्थानिक ५, स्नेहानगर शिवमंदिर जवळ १, गोकुलनगर ५, अयोध्यानगर २, बालाजीनगर १, कॅम्प एरिया १, स्नेहवाॅर्ड १, रेड्डी गोडाऊन जवळ २, रामनगर ३, बसेरा कॉलनी १, साईनगर २, लक्ष्मीनगर १, रामपुरी वाॅर्ड १, सोनापूर कॉम्पलेक्स १, सर्वोदय वाॅर्ड २, पोर्ला १, माथुरानगर १, आयटीआय चौक १, अहेरी तालुक्यातील स्थानिक १४, आलापल्ली २, महागाव १, आरमोरी तालुक्यातील स्थानिक ७, बस स्टॉप जवळ १, भामरागड तालुक्यातील हिंडेवाडा १, येला १, चामोर्शी तालुक्यातील टिचर कॉलनी १, हनुमान नगर १, स्थानिक १, आष्टी १, धानोरा तालुक्यातील स्थानिक १, एटापल्ली तालुक्यातील गरपल्ली १, स्थानिक १, कोरची तालुक्यातील स्थानिक १, मुलचेरा तालुक्यातील मोहुर्ली १, स्थानिक १, देेसाईगंज तालुक्यातील स्थानिक १, माता वाॅर्ड ३, कस्तुरबा वाॅर्ड १, अरुणनगर १, कोरेगाव १, हनुमान वाॅर्ड २ बाधितांचा समावेश आहे. ग्रामीण भागातही रूग्ण आढळण्याचे प्रमाण वाढले आहे.
आराेग्य विभागाचा अंदाज खरा ठरला
दिवाळीच्या कालावधीत बाजारपेठेत उसळलेली गर्दी बघून दिवाळीनंतर काेराेना रुग्णांची संख्या वाढेल, असा अंदाज आराेग्य विभागाने व्यक्त केला हाेता. हा अंदाज खरा ठरत दिवाळी संपताच आता काेराेना रुग्णांच्या संख्येत वाढ हाेत असल्याचे दिसून येत आहे. दिवाळीच्या सणापूर्वीच काही जणांना काेराेनाची लागण झाली हाेती. मात्र दवाखान्यात राहिल्यास दिवाळीचा आनंद लुटता येणार नाही. ही बाब लक्षात घेऊन अनेकांनी चाचणी केली नाही. ते नातेवाईक, बाजारपेठ व घरी खुलेआम फिरत हाेते. अशा रुग्णांनी अनेकांना संसर्ग केला आहे. दिवाळी संपताच आता संसर्गबाधित जुने व नवे रुग्ण आता दवाखान्यात दाखल हाेत आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. ती आणखी वाढण्याचा धाेका निर्माण झाला आहे. भाऊबिजेसाठी काही नागरिक दुसऱ्या गावी गेले आहेत. प्रवासादरम्यान त्यांना संसर्ग हाेण्याची भीती आहे.