रेल्वे मार्ग व प्लॅटफॉर्मचे काम सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 12:55 AM2018-09-09T00:55:47+5:302018-09-09T00:56:35+5:30

गडचिरोली-चिमूर या मागास नक्षलग्रस्त लोकसभा क्षेत्रात रेल्वेचे जाळे नसल्याने या भागाचा विकास खुंटला आहे. या भागात मोठ्या प्रमाणात खनिज व वनसंपत्ती आहे. या खनिज संपत्तीवर प्रक्रिया होण्यासाठी उद्योगधंद्याची गरज आहे. उद्योग निर्माण होण्यासाठी रेल्वे मार्ग सुरू होणे आवश्यक आहे.

Start the work of railways and platforms | रेल्वे मार्ग व प्लॅटफॉर्मचे काम सुरू करा

रेल्वे मार्ग व प्लॅटफॉर्मचे काम सुरू करा

Next
ठळक मुद्देखासदारांचे अधिकाऱ्यांना निर्देश : रेल्वे समितीच्या बैठकीत घेतला कामे व सुविधांचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली-चिमूर या मागास नक्षलग्रस्त लोकसभा क्षेत्रात रेल्वेचे जाळे नसल्याने या भागाचा विकास खुंटला आहे. या भागात मोठ्या प्रमाणात खनिज व वनसंपत्ती आहे. या खनिज संपत्तीवर प्रक्रिया होण्यासाठी उद्योगधंद्याची गरज आहे. उद्योग निर्माण होण्यासाठी रेल्वे मार्ग सुरू होणे आवश्यक आहे. त्यासाठी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी लोकसभा क्षेत्रातील मंजूर झालेले रेल्वे मार्ग व प्लॅटफार्मचे काम लवकर सुरू करून या कामाला गती द्यावी, असे निर्देश खासदार अशोक नेते यांनी मंडळस्तरीय रेल्वे समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिले.
गुरूवारी खा. अशोक नेते यांनी नागपूर येथील रेल्वेच्या मंडळ कार्यालयात रेल्वे मार्ग व इतर कामांबाबत आढावा बैठक घेतली. या बैठकीला भंडाराचे खासदार मधुकर कुकडे, बालाघाटचे खासदार बोधसिंह भगत, मुख्य रेल्वे प्रबंधक सुनीलसिंह सोर्इंग, विभागीय रेल्वे व्यवस्थापक शोभना भट्टोपाध्याय, वरिष्ठ मंडळ रेल्वे प्रबंधक श्रीवास्तव, नागपूर मंडळाच्या अधिकारी तसेच बिलासपूर तसेच नागपूर झोनचे वरिष्ठ रेल्वे अधिकारी, निर्माण अभियंता व अन्य अधिकारी उपस्थित होते. याशिवाय सदर बैठकीला आमगाव विधानसभा क्षेत्रातील भाजपचे पदाधिकारी यशवंत मानकर, उत्तम नंदेश्वर, हुकूमचंद बहेकार, घनश्याम अग्रवाल, कैलास तिवारी, संपत सोनी आदी मान्यवर उपस्थित होते. या बैठकीत बोलताना खा. अशोक नेते म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यासह लोकसभा क्षेत्रात बेरोजगारीची समस्या तीव्र झाली आहे. हजारो युवकाच्या हाताला काम नाही. त्यामुळे उद्योगधंदे निर्माण करणे गरजेचे आहे. त्यासाठी रेल्वेमार्गाचे जाळे विकसीत करण्यास प्राधान्य दिले पाहिजे, या दृष्टीकोणातून रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी कामाची गती वाढवावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. याप्रसंगी विविध रेल्वे मार्ग व प्लॅटफार्मच्या कामाबाबत चर्चा करण्यात आली.
रेल्वे मार्गाच्या भूमीअधिग्रहणावर चर्चा
खासदार अशोक नेते यांनी वडसा-गडचिरोली या ५२ किमी अंतराच्या रेल्वे मार्गासाठीची भूमीअधिग्रहणाची स्थिती काय आहे, याबाबतची माहिती उपस्थित रेल्वे अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. तसेच आमगाव, गोंदिया, डोंगरगड, सालेकसा तालुक्यातील धानोली, किडकीपार, नागभिड, ब्रह्मपुरी, सिंदेवाही व वडसा या ठिकाणचे प्लॅटफार्मची कामे रेल्वे मार्गाबाबत सदर बैठकीत चर्चा करण्यात आली. वडसा-चिमूर या रेल्वे मार्गाचे काम लवकर होण्यासाठी भूमीअधिग्रहणाची कार्यवाही अधिकाऱ्यांनी गतीने करावी. सदर रेल्वे मार्गाचे काम लवकर सुरू करावे, अशा सूचना खा. नेते यांनी दिल्या. गडचिरोली येथील रेल्वे आरक्षण केंद्र डाक कार्यालयात स्थानांतरीत करण्यात आले असून हे आरक्षण केंद्र सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे निर्देश खा. अशोक नेते यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना दिले.

Web Title: Start the work of railways and platforms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.